Gamesमूलचेरा तालुका

क्रिडा संमेलनातून खेळाडुंमधील सुप्त गुणांना वावं मिळतो..माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क… मूलचेरा..

क्रिडा स्पर्धांच्या आयोजनातून ग्रामीण भागातील खेळाडुं- मधील सुप्त गुणांना वावं मिळतो.युवकांमध्येअनेक प्रकारचे सुप्त गुण दडले असून ते सुप्तगुण प्रदर्शित करण्यासाठी असे क्रिडा संमेलन हे चांगला व्यासपीठ ठरणारआहे.ग्रामीन व शहरी भागातील युवकांमधील कला गुणांना वावं देण्यासाठी मागील अनेक वर्षांकडून आदिवासी विद्यार्थी संघाकडून प्रत्येक गांवात विविध मंडळाकडून क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून वेळोवेळी अनेक बहुमूल्य असे आकर्षक पुरस्कार देण्याचा काम आविस कडून होत असल्याचे प्रतिपादन आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले.ते मूलचेरा तालुक्यातील कोलपल्ली येथे श्री गणेश युवा क्रिडा मंडळाकडून आयोजित व्हॉलीबॉल या स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी केले.

या व्हॉलीबॉल क्रिडा स्पर्धेला अध्यक्ष म्हणून आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार होते. व्हॉलीबाल स्पर्धेचे उदघाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करून थोरमहाम्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . या उदघाटन स्पर्धेला अध्यक्ष म्हणून लाभलेले माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात क्रिडा विषयी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. या स्पर्धेत पहिला पुरस्कार माजी आमदार आत्राम यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार कडून तर तृतीय पुरस्कार येथील शिक्षक वृंद व पोलीस शिपाई वृंद यांच्याकडून ठेवण्यात आले.या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांकडून वैयक्तिक पुरस्कारही ठेवण्यात आले.

प्रमुख अतिथी म्हणून रोशनीताई कुसनाके सरपंच,अरुण कडते सरपंच,जीवणकला तलांडे सदस्य, सौ.सुनीता कुसनाके नगरसेविका मुलचेरा,कालिदास कुसनाके,हरीश कोवे,पंकज कुसनाके,उमेश आत्राम,सुरेश कुसनाके,शामराव पोरतेट, गुरुदास कडते,संदीप तोरे,रवींद्र झाडे,कार्तिक डोके,मनीष मारटकर माजी सरपंच,श्रीकांत समदार,कालिदास कुसनाके ग्रा.प.सदस्य,सौ.पल्लवीताई रतनपुरे ग्रा.प.सदस्य,आलापलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री.विजय कुसनाके,विशाल रापेल्लीवार,जुलेख शेख,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक,राकेसडमेक होते.

उदघाटन सामन्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष:-कालिदास चौधरी,उपाध्यक्ष:-उमेश आत्राम,सचिव:-बंडू पोरतेट,सहसचिव:-अजय चौधरी,आयोजक:-सतीश चौधरी,कोशाध्यक्ष:-गणेश चौधरी व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. उदघाटन सोहळ्याला क्रिडा प्रेमी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close