Gamesअहेरी तालुका

देवलमरी येथील व्हॉलीबॉल सामन्याचे बक्षीस वितरण माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

📝अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे न्यू स्टार क्रीडा मंडळकडून व्हॉलीबॉल सामान्याचे आयोजन करण्यात आले होते. या व्हॉलीबॉल सामान्याचे बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या थाटात पार पडला.या सामान्याचे बक्षीस वितरण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सामान्यातील विजयी संघाना करण्यात आले.देवलमारी येथे आयोजित व्हॉलीबॉल सामान्याचे विजयी संघांना प्रथम पुरस्कार आविस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडून तर तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत देवलमरी कडून देण्यात आले.

बक्षीस वितरण सोहळ्याला आल्लापल्ली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच विजय कुसनाके,महेश लेकुर ग्रा.पं.सदस्य,माजी सरपंच गुलाबराव सोयाम ,जूलेख शेख,नरेंद्र गर्गम,अक्षय अलेवार,गोपाल लेकुर,शंकर चालुरकर,संजय गोंडे, सुधाकर लेकुर,गणेश गदास्वार,सुधीर बामणकर,रमेश तोकला,वैकुनटम इसंकर, रवी पानेम, व्यंकटेश पानेम,अक्षय सडमेक, मुकेश गांडला,सुधीर बीचाला,अजय मारीन,प्रमोद आत्राम हरीश गांडला,पोचम गांडला,सत्यराज गौडेवार,सुरेश काटेल व समस्त गावकरी मंडळाचे पदाधिकारी उपास्थित होते.

या व्हॉलीबॉल समान्याचे यशस्वी आयोजनासाठी न्यू स्टार क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य गणांनी अथक परिश्रम घेतले उदघाटन व बक्षीस वितरण सोहळ्याला क्रीडाप्रेमीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close