GamesTravel

चेरपल्ली येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

*अहेरी*....तालुक्यातील चेरपल्ली येथे जय भिम क्रिकेट क्लब यांच्यावतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आला होता. नुकताच या सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते पार पडला.

या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी नगराध्यक्षा रोजाताई करपेत,नगरसेविका नोराज शेख,नगरसेवक विलास गलबले,नगरसेवक महेश बाकेवार,अधिवक्ता पंकज दहागावकर,मुख्याध्यापिका पेंदाम मॅडम,मुख्याध्यापक बरडे सर,मल्ला रामटेके,विनोद रामटेके,राजेश करपेत,कोंडागुर्ला सर,बाजीराव रामटेके,दुर्गाबाई सुनतकर,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,सलीम शेख संदीप बडगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या मार्गदर्शनातून क्रिकेट या खेळावर प्रकाश टाकले. या क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून 30 हजार रु.रोख तर द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या कडून 20 हजार रु रोख आणि तृतीय पुरस्कार शिवसेना अहेरी जिल्हा प्रमुख (उद्धव ठाकरे) रियाज शेख व नौरास /निखत शेख यांच्याकडून 10 हजार रु.असे पुरस्कार ठेवण्यात आले. या टेनिस बॉल क्रिकेट सामन्यात अनेक संघांनी सहभाग घेतले. उदघाटनीय कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी जय भीम क्रिकेट क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close