अहेरी तालुका

सुरजागडचे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या जडवाहनांमुळे पिकांची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची साखळी उपोषणाला सुरुवात !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

📝अहेरी …आल्लापल्ली -आष्टी ३५३(C) या राष्ट्रीय महामार्गावरून एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोह प्रकल्पातून लोहयुक्त असलेला चुरा दगड याच मार्गाने दररोज हजारो जडवाहनाची दळणवळण होत असते,मात्र या आलापल्ली ते आष्टी राष्ट्रीय महामार्गावरील दुतर्फा रस्त्यालगत असलेल्या शेतांमध्ये लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनामूळे धूळ पसरून उभी पिके पूर्णतःनष्ट झाले,यामुळे शेतकऱ्यांची पिकांची अतोनात नुकसान झाले आहे मात्र नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीची नुकसान भरपाई मीळण्यासाठी बोरी,शिवणीपाठ, रामपूरचेक,राजपुर पंँच खमनचेरू ईतलचेरू येथील शेतकऱ्यांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना दिनांक १० नोव्हेंबर 2022 व ८ डिसेंबर २०२२ व‌ १९ डिसेंबर २०२२ला नुकसानग्रस्त पिकांची भरपाई मिळण्याकरिता निवेदन सादर करण्यात आले. मात्र निवेदन देऊन तिन महिन्याचा कालावधी लोटूनही अजून पर्यंत शासन व प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने अखेर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मीळण्याकरीता तहसील कार्यालय अहेरी येथे दि.२ जानेवारी २०२३ पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली असून या साखळी उपोषणात बोरी,रामपूरचेक, राजापूर पँच, शिवनीपाठ, खमणचेरू, इतलचेरु, या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची समावेश असून शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह उपोषणाला सुरुवात केली आहे.

या उपोषण मंडपाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन या उपोषणाला आदिवासी विध्यार्थी संघटनेचा पूर्णतः पाठिंबा असल्याचे उपस्थितीत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे सोबत खमनचेरु ग्रामपंचायत चे सरपंच सायलू मडावी,राजपूर पँच ग्रामपंचायत चे सदस्य मधूकर वेलादी,प्रभाकर मडावी
अर्जुन शेंडे,पत्रु ठाकरे,सुरेश आदे,गोपाळ आदे,बाबुराव आदे,नागेश मोहुर्ले,दशरथ निकोडे,बिच्छू कंपेलवार,शंकर निकेसर,यादव कोकीरवार,चंदू मोहुर्ले,फकीरा निकेसर,विलास निकेसर,बापू‌ ठाकरे, दिनेश मडावी आदि शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close