अहेरी तालुका

अहेरी ते खममचेरु रस्त्याची काम पूर्वव्रत सुरू होणार !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

📝अहेरी:- तालुक्यातील खमनचेरु ते अहेरी हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत मंजूर असून वनविभागाचे काही कर्मचाऱ्यांनी सदर कामात अडथळा आणून काम बंद पाडले. अहेरी ते खमनचेरू हे तालुक्याला जोडणारा एकमेव मुख्य मार्ग आहे. संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे काम सुरु

करायला तयार असतांना वनवीभागाचे काही कर्मचाऱ्यांनी या कामात अडथळा आणून काम बंद पाडल्याचे माहिती माजी जि. प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्यांनी आल्लापल्लीचे उपवनसंरक्षक अधिकारी टोलिया यांना भेटून या कामाबद्दल विचारणा केली आणि अहेरी ते खमनचेरू या रस्त्याचे कामाला सहकार्य करण्याचे विनंती केले. यावेळी उपवनसंरक्षक टोलिया यांनी यापुढे या रस्त्याच्या कामात वनविभागाकडून कोणत्याही प्रकारचे अडथळा येणार नाही ,असे आश्वासन उपवनसंरक्षक यांनी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांना दिली.

उपवनसंरक्षक टोलिया यांच्या सोबत चर्चा करतांना माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे सोबत माजी जि.प.सदस्या सुनीता कुसनाके ,अहेरी नगर पंचायत चे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,नगरसेवक विलास सिडाम ,नगरसेवक विलास गलबले शायलू मडावी सरपंच खमनचेरु,वंदना दुर्गे सदस्य महागाव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. माजी जि.प.अध्यक्ष कंकडाळवर यांच्या प्रयत्नाने अहेरी ते खमनचेरु या रस्त्याचे कामाला वनविभागाकडून येणाऱ्या अडथळे दूर झाल्याने नागरिकांनी त्यांच्या याकामाप्रति समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close