Gamesअहेरी तालुका

युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासावी…माजी जि.प.अध्यक्ष..अजयभाऊ कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …अहेरी तालुका…

📝युवक या देशाचा आधारस्तंभ असुन युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासत व्यक्तीमत्व विकासाला चालना घ्यावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केले,ते अहेरी तालुक्यातील कीस्टापूर येथे जय सेवा युवा मंडळ,कीस्टापूर यांच्या वतीने आयोजित टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचा उदघाटन प्रसंगी उपस्थितीतांना मार्गदर्शन करतांना केले. टेनिस बाल क्रिकेट सामन्याचे उदघाटन सोहळा थाटात पार पडला. क्रिकेट सामन्याचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आलापल्ली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच विजय कुसनाके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वेलगुरचे सरपंच किशोर आत्राम,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,माजी उपसभापती गीताताई चालूरकर ,नरेश मडावी ग्रा.प.सदस्य कीस्टापूर,नगरसेवक.प्रशांत गोडसेलवार,माजी सरपंच दिलीप गंजीवार,संदीप बडगे ,जुलेख शेख,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,दादाराम मडावी,हरिभाऊ आत्राम,अनंत साना,कालिपद वैद्य,सोमाजी आत्राम,आनंदराव चहाकाटे,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक उपस्थित होते.

जय सेवा युवा मंडळ,कीस्टापूर यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष हरी आत्राम, उपाध्यक्ष अनिल दब्बा,मधुकर झोडे, सचिव ,जीवन आत्राम , सहसचिव:- गौतम गावळे, कोषाअध्यक्ष:-मनीष मडावी, क्रीडाप्रमुख:-अजित आत्राम इत्यादी मंडळगण उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यस्ववीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण गावकरी महिला वर्ग क्रिकेट प्रेमी आदींनी अथक परिश्रम घेतले.

या क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून 25 हजार रुपये तर द्वितीय पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून 21 हजार रुपये तर तृतीय पुरस्कार सरपंच किशोरभाऊ आत्राम व उपसरपंच उमेशभाऊ मोहूर्ले यांच्याकडून संयुक्तरित्या 11हजार एकशे अकरा रु.ठेवण्यात आले असून या सह अनेक वयक्तिक व आकर्षक पुरस्कार ही मंडळाकडून ठेवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close