अहेरी तालुका

रानडुकराच्या हल्ल्यातील मृत वृध्दाच्या कुटुंबाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत.

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : तालुक्यातील वेलगुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोटलाचेरू येथील रहिवासी विस्तारी शिवय्या जक्कुलवार (६० वर्षे) यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतकाची कुटुंबाची सांत्वन करून अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी त्यांना आर्थिक मदत केली.

जक्कुलवार हे काल नेहमीप्रमाणे सायंकाळी जंगलातून म्हशींना आणल्यानंतर घरासमोरील अंगणात त्या बांधल्या.बाजुला त्यांना म्हशीच्या वगारासारका प्राणी दिसला.पण तो रानडुक्कर होता हे त्यांच्या लक्षात आले नाही.त्यामुळे त्यांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला असता काही कळायच्या आत विस्तारी यांच्यावर रानडुकराने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.त्या अवस्थेत त्यांचा मुलगा,नातेवाईक व गावातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे भरती केले. पण डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास सांगितले पण घरातील मंडळींनी याला नकार दिला.पण अजयभाऊ कंकडालवार यांनी शासकीय कामासाठी व वनविभागाला शवविच्छेदन अहवालाची प्रत आवश्यक असल्याचे त्यांना समजावून सांगितल्यावर नातेवाईकांनी मृतकाची शवविच्छेदन करण्यास होकार दिला.यावेळी कंकडालवार यांनी मृतदेह गावी नेण्यासाठी त्यांना गाडीची व्यवस्था करून दिली.

जक्कुलवार यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तिसऱ्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमासाठी कंकडालवार यांनी आर्थिक मदत करणार असल्याचे त्यांच्या कुटूंबाला सांगितले. यावेळी प्रशांत गोडसेलवार, राकेश वर्दलवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close