सिरोंचा येथील बालाजी मंदिरात श्री रंगनाथ स्वामी व गोदादेवी कल्याण महोत्सव उत्साहात संपन्न !
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …येथील पुरातन बालाजी मंदिरात धनुर्मास समाप्तीच्या दिवशी 14 जानेवारीला श्री रंगनाथ स्वामी व गोदादेवीची कल्याण महोत्सव शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला. या मंदिरात धनुर्मास प्रारंभापासून तर समाप्तीपर्यंत दररोज भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात.काल शनिवारला या मंदिराचे अर्चक सत्यनारायण दाशरथी सह वेदपंडितांच्या मंत्रोप्पचाराने श्री रंगनाथस्वामी व गोदादेवीची कल्याण महोत्सव पार पडला. या कल्याण महोत्सवाला भक्तांची अलोट गर्दी होती.यावेळी कल्याण महोत्सवासाठी आलेल्या शेकडो भक्तांनी महाप्रसादाचे आस्वाद घेतले. या कल्याण महोत्सवाला महिला भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती.श्री रंगनाथ स्वामी व गोदादेवी कल्याण महोत्सवाची यशस्वी आयोजनासाठी मंदिराचे पुजारी सत्यनारायण दाशरथीसह बालाजी भक्तांनी परिश्रम घेतले.