सिरोंचा तालुका

मद्दीकुंठा गावात तात्काळ आरोग्य शिबिराचे आयोजन करा !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा तालुक्यातील मद्दिकुंठा या गावात गेल्या आठवडा भरापासून प्रत्येक कुटुंबात डेंगु या बिमारीचा थैमान पसरलेले आहे, गावात भितीचे वातावरण निमार्ण झाली असून आजच्या दिवसात अंदाजे 80 ते 100 पर्यंत रुग्ण डेंग्यू या बिमारीने ग्रस्त असल्याचे माहिती आहे. या गावातील
रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होण्या ऐवजी रुंगा संख्या वाढ होत आहे, मद्दीकुंठा या गावात शासन आणि प्रशासनाकडून या बिमारीविषयी कोणत्याही प्रकारचे आरोग्य विषयी दखल घेण्यात आली नाही अशी ग्रामस्थांची म्हणणे आहे.
त्याकरिता मद्दीकुंठा गावातील काही नागरिकांनी व रुग्णाचे नातेवाईकांनी तालुका पत्रकार संघटनेला (डिजिटल मीडिया) आरोग्य समस्याची माहिती देताच संघटनेचे अध्यक्ष – सागर मूलकला यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे बांधवांनी मद्दिकुंठा या गावात तत्काळ आरोग्य शिबिराचे आयोजन करून डेंगुचा थैमानला लवकरात लवकर आरोग्य शिबीर लावून आळा घालण्यात प्रयत्न करावी , अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी सिरोंचा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे,
आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देतांना डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे सचिव – सत्यम गोरा, श्याम बेज्जनवार , रवी सल्लम , अशोक कुम्मरी,शंकर जिमडे,सुधाकर सिडाम , जलील शेख आदी उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close