Gamesअहेरी तालुका

कमलापूर येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
✍️ अहेरी:- तालुक्यांतील कमलापूर ते kpl क्रीडा मंडळ च्या वतीने टेनिस बाल क्रिडा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेतल्या विजयी संघांना प्रथम पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर दूसरा पारितोषिक माजी जि.प.सदस्य अजय नैताम व माजी सभापती सुरेखा आलाम यांच्या कडून तर तिसरा पारितोषिक ग्राम पंचायत कमलापूर यांच्याकडून देण्यात आला.
सदर स्पर्धेत एकूण ३० संघ भाग घेतले होते.आज शेवटचा दिवस अंतिम सामना अहेरी विरुद्ध कमलापूर यांच्यात रंगला असुन प्रथम पारितोषिक अहेरी संघाला तर दूसरा पारितोषिक कमलापूर संघाला मिळाला असुन अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम,उपसरपंच सचिन ओल्लेटीवार,ग्राम पंचायत सदस्या इंदू पेंदाम माजी
उपसरपंच संजय पोरतेट,प्रतिष्ठित नागरिक,इरसाद शेख,सुदीप रंगूवार,दिप आत्राम,बबी चौधरी,मंचावर उपस्थिति होते.
यावेळी मंडळचे अध्यक्ष व मंडळचे सदस्यगण व गावातील महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close