युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासावी !
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी तालुक्यातील महागाव (बू.) येते भव्य टेनिस बाल क्रिकेट सामन्याचे उदघाटन.युवक या देशाचा आधारस्तंभ असुन युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासात व्यक्तीमत्व विकासाला चालना घ्यावी तसेच आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांच्या विकास करावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केले,अहेरी तालुक्यातील महागाव (बू.) येथे गॉड लाईक क्रिकेट क्लब महागावच्या वतिने आयोजित भव्य टेनिस बाल सामन्यांच्या उदघाटन प्रसंगी उदघाटन स्थानावरून बोलत होते,ते बोलतान पुढे म्हणाले,आज ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक ठिकाणी व्हलिबाल, क्रिकेट,कबड्डी स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत प्रत्येक ठिकाणी माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम व माझा स्वतः कडून व आदिवासी विध्यार्थी संघाकडून पारितोषिक देत असताना आम्हाच्या एकच उद्देश्य आहे.युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे व एक चांगल खेळाडू तयार झाले पाहिजे तेव्हाच तर आपल्या गावाच्या व तालुक्याच्या नावलौकीक होत असतो.हे होत असताना गावातीला सामाजिक,शैक्षणिक,व विकासाबाबतीत चर्चा घडून येत असते व समस्याच्या निराकरण होत असते असे मत व्यक्त केले.
यावेळी माजी सभापती श्री.भास्कर तलांडे यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले खेळाडूंनी त्यांच्यात असलेले सुप्त गुणांना वाव द्यावे,व पंचांनी योग्य निर्णय देवून सदर स्पर्धा खेळिमेळीचे वातावरणात पार पाडवी असे मार्गदर्शन केले.या स्पर्धा मध्ये प्रथम पुरस्कार ३०,००० हजार रुपये, दितीय २०,००० हजार रुपये ,तर तृतीय १०,००० हजार रुपये,असे याठिकानी पारितोषिक देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित नागरिक श्री.भीमण्णा पानेम होते.विशेष अतिथि म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वांगेपली ग्राम पंचायतचे सरपंच श्री.दिलीप मडावी,उपसरपंच श्री.राजेश कोत्तापलीवार,ग्राम पंचायत सदस्य श्री.राजू दुर्गे, सौ.वंदना दुर्गे,सोनू गरगम,उमा माडगूलवार,प्रतिष्ठित नागरिक चंद्रजी रामटेके,डॉ.करमे,श्रीनिवास आलोने,सदाशिव गरगम,प्रमोद रामटेके,शंकर झाडे,नारायण आलोने,विलास गरगम,राजारामचे माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,दामोधर गोंगले,स्वामी आत्राम आदि मंचावर उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमर गरगम, उपाध्यक्ष गौतम गरगम,सहसचिव सूरज बाला कोषाअध्यक्षअभिषेक गरगम क्रीडाप्रमुख प्रवीण दुर्गे,गणेश दुर्गे,व सदस्यगण मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण गावकरी महिला वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री राजू दुर्गे यांनी केली..!!