जारावंडी येथे करंडा कुंकुवाचा या नाटकाचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
एटापल्ली…तालुक्यातील जारावंडी येथे जयसेवा कला नाट्य कला मंडळाकडून आयोजित करंडा कुंकुवाचा या नाटकाचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते पार पडला.
या नाटकाचे उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जारावंडीचे सरपंच सपनाताई कोडापे, सुधाकर टेकाम उपसरपंच जारावंडी, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भाऊ चरडुके,शामल ताई मडावी माजी सरपंच दिंडवी,प्रवीण मनरट्टीवार,प्राध्यापक कांबळे सर,योगेश कुंमरे,हरिदास टेकाम माजी सरपंच,सुधाकर नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य,रमेश दुग्गा उपसरपंच सरखेडा,संतोष मडावी ग्रामपंचायत सदस्य दिंडवी, उमेश वेलादी,सुरेश तलांडे ग्राप सदस्य जारावंडी,जनक शहा नाहमूर्ती नीलकंठ चौधरी,कालिदास गेडाम जुलेख शेख,विनोद कावेरी सह आविस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नाटक क्षेत्राबद्दल उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी जारावंडी सह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.