निवडणूकमूलचेरा तालुका

लगाम येथील आविका वर आविस समर्पित भारत राष्ट्र समितीची झेंडा

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

मूलचेरा:लगाम येथे नुकताच आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे निवडणूक पार पडले.या निवडणुकीत भारत राष्ट्र समितीचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थेचे निवडणूक लढविण्यात आले होते. या निवडणुकीत मोतीराम गणू सिडाम हे सभापती पदी निवडून आले तर सदस्य म्हणून वासुदेव हनुमंतु मडावी,चिंन्ना पेंटा नैताम,मिराजी मडावी,शिवराम मडावी,रमेश सिडाम हे निवडून आले.आविका निवडणुकीत निवडून आलेल्या पदाधिकारी व सदस्यांचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी सत्कार केले. यावेळी आविस सल्लागार,लगाम माजी उपसरपंच देवाजी सिडाम,आविस सल्लागार कीर्तीमंतराव सिडाम,माजी जि.प.संजयभाऊ चरडुके,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close