Gamesअहेरी तालुका

प्रभाग क्रमांक 15 मधील रात्रकालीन क्रिकेट सामन्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी येथील गुप्पा मित्रा परिवार प्रभाग क्रमांक 15 तर्फे भव्य रात्रीकालिन टेनिस बॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून ₹31,001/- देण्यात येत आहे.तर द्वातीया पारितोषिक अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष. कु.रोजा करपेत,शिवसेना जिल्हा प्रमुख ( उद्धव ठाकरे गट ) रियाज शेख, अहेरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांच्या कडून ₹21,001 देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक शहीद राजरेड्डी गद्देवार स्मृती प्रित्यर्थ श्री. गद्देवार बंधू यांच्या कडून ₹11,001 असे तीन पारितोषिक हा स्पर्धेसाठी देण्यात येत आहे.सदर स्पर्धेचे लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ( Ajaykankdalwar ) अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन होते..!!

यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक विलास सिडाम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकेवार, नगरसेवक विलास गलबाले,निकील गद्देवार, शुशील गुंडावार, वेंकटेश सुरामवार,सुदामा हालदर,राकेश गणमुकूलवार,बापूराव सुरामवार,कार्तिक तोगम,राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, राकेश अल्लूरावारसह आविसंचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close