Gamesअहेरी तालुका

रेपनपल्ली येथील व्हॉलीबॉल सामन्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी तालुक्यातील रेपनपली येथे पोचम्मा क्रिडा मंडळ च्या वतिने आयोजित भव्य व्हलिबाल सामन्याच उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी उदघाटन स्थानावरून बोलताना कंकडालवार म्हणाले कि, आज ग्रामीण आणि शहरी भागासाठी व्हॉलीबॉल, क्रिकेट,कबड्डी स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत तर त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या स्वतः कडून व आदिवासी विध्यार्थी संघाकडून पारितोषिक देत असताना यामागील एकमेव उध्येश की,ग्रामीण व शहरी भागातील युवकांना खेळण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण झाले पाहिजे व एक चांगल खेळाडू तयार झाले पाहिजे मग यातूनच आपल्या गावाच्या व तालुक्याच्या नावलौकीक होत असतो.हे होत असताना गावातील सामाजिक,शैक्षणिक,व विकासाबाबतीत चर्चा घडवून आणत असतात.व अनेक समस्यांच्या यातून मार्ग ही निघत असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

यावेळी माजी सभापती भास्कर तलांडे यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले खेळाडूंनी त्यांच्यात असलेले सुप्त गुणांना वाव द्यावे,व पंचांनी योग्य निर्णय देवून सदर स्पर्धा खेळिमेळीचे वातावरणात पार पाडवी असे मार्गदर्शन केले.या स्पर्धा मध्ये प्रथम पुरस्कार २१,००० हजार रुपये, दितीय १५,००० हजार रुपये ,तर तृतीय ११,००० हजार रुपये,असे याठिकानी पारितोषिक देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार होते,तर अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद् सदस्य अजय नैताम,पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखा आलाम,रेपनपलीचे सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी, श्रीनिवास पेंदाम सरपंच कमलापूर,सचिन ओलेट्टीवार उपसरपंच,सौ.छाया सड़मेक, ग्रा.पं.सदस्या,लक्ष्मण कोडापे ग्रा.पं सदस्य रेपणपली,प्रणाली मडावी, इंदुताई पेंदाम ग्रा.पं सदस्य, इंदारामचे माजी सरपंच,तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री.गुलाबराव सोयाम,माजी सरपंच लक्ष्मण येलम,कमलाताई गावडे,रूख्मा गेडाम,गंगाराम मडावी,आडगोपुलवार साहेब,आविस कार्यकर्ते संतोष सिडाम, राकेश सडमेक, रवि भोयर,बाजीराव आत्राम,श्रीनिवास सिडाम,सीताराम गावडे,दुर्गा सिडाम,बंडु सड़मेक,विलास सिडाम,सुरेश येलम,दिवाकर आलाम,प्रकाश दुर्गे, वासुदेव सिडाम, आदि मंचावर होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवराज सिडाम,सत्यम आत्राम,तिरुपती सिडाम,महेश कोडापे,नरेश सिडाम,गणेश गावडे,व मंडळाचे सदस्य व गावांतील महिला पुरुष उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close