आविसंचे प्रत्येक कार्यकर्ता हा संघटनेच्या आत्मा आहे!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा तालुक्यातील सर्व आदिवासी विध्यार्थी संघाचे पद्द्धिकारी,सक्रिय कार्यकर्ते यांच्या दिनांक ४/२/२०२३ ला सिरोंचा येतील शासकीय विश्रामगृहात आदिवासी विध्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांचे बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यकर्त्यांच्या बैठकीला अध्यक्षस्थानावरून बोलतांना आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार बोलले आदिवासी विद्यार्थी संघ हे शून्यतून निर्माण झाली आहे.जसे कुंभार मडके बनवतांना दहा बारा मडके फुटून खराब होत असतात व ते वाया हि जात असता मात्र कुंभार हा आपला कामं ना सोडता सतत सुरू ठेवत असतो.आणि नंतर पन्नास ते शंभर मडके तयार करत असतो.त्याचप्रमाणे आज आदिवासी विद्यार्थी संघटनेत कार्यकर्ते आहेत.जेव्हा अहेरी विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदा आदिवासी विद्यार्थी संघ गठित करण्यात आला त्यावेळी अनेक अडचणीच्या सामान करावा लागत होता मात्र नाईलाज असल्याने हुकमशाही व राजेशाही घराण्याचा विरोध करत मी माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम यांच्या नेत्रुत्वात ग्राम पंचायत सदस्य,पंचायत समिती सदस्य ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पर्यंत पोहचलो व राजघराण्याच्या विरोध जावून शेतकऱ्यांना असो तरुण वर्गाला व गोरगरीबच्या मदतीला जावून कामं करीत होतो त्यामुळे जनतेने माझावर आज हि विश्वास करत असते.अहेरी विधानसभा क्षेत्रात अपक्ष असताना सुध्दा पाच वर्षा सत्तेत असताना अनेक कामे करण्यात आले आहे.व कार्यकर्ता जोडून ठेवण्यात आले.आज आदिवासी विध्यार्थी संघ हे एक संघटना असून सुध्दा अहेरी विधानसभा क्षेत्रात एक राष्ट्रीय पक्षासारखे जनतेचे प्रश्न सोडवत असून आदिवासी विध्यार्थी संघात आज लहान ते मोठा गरीब ते श्रीमंत असो मात्र सर्वांना कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता समान या भावनेतुन स्थान दिला जात आहे.आज कित्येक उदाहरण आहेत कार्यकर्ता ते ग्राम पंचायत सदस्य,नंतर जि.प.सदस्य ,सभापती असे पद दिले आहे.म्हणूनच कार्यकर्ते आजही आदिवासी विद्यार्थी संघाशी एकनिष्ठाने राहून कामं करत असून लहान ते मोठा कार्यकर्ता सुध्दा आज संघटनेचा आत्मा आहे.आज कार्यकर्ता नसेल तर आपली प्राणच नाही त्यामुळे कार्यकर्ता हाच आदिवासी विध्यार्थी संघाच्या आत्मा असल्याच सांगत गेल्या काही महिन्यापासून आदिवासी विध्यार्थी संघात मोठी पुट पडत असून येणाऱ्या पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुका कार्यकर्ते जे निर्णय घेतील मी त्याचा आदर करून समोरील रणनीति ठरवण्यात येईल असे भावुक प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली..!!
यावेळी उपस्थित आविसंचे जेष्ठा नेते मंदा शंकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला, मंदारम ग्रामपंचायत सरपंच दिवाकर कोरेत, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी पंचायत सभापती अहेरी भास्कर तलांडे, सुरेखा आलाम माजी सभापती अहेरी, सिरोंचा नगरपंचायत नगरसेवाक इम्तियाज खान, मारुती गणपूरवार, अहेरी नगरपंचायत नगरसेवाक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक विलास गलबाले, माजी सरपंच गुलाब सोयाम, उपसरपंच सत्यम निलम, संतोष सिडाम सरपंच नारसायपाल्ली, राधेश्याम तोगारी उपसरपंच कोटापाल्ली,दीपक अर्क,शंकर वेलदी माजी सरपंच ग्रामपंचायत तिरमाळा,माजी सरपंच ग्रामपंचायत पेंटिपाका सोमान्ना गदे,रेगुंठा ग्रामपंचायत सदस्य अशोक तालडी,चिंतारेवला ग्रामपंचायत उपसरपंच तिरुपती जोडे, भास्कर बेडके, कोटारी श्रीनिवास, देणाभोयना नागेश, तोटला मलाय्या, महेश भांडारी माजी उपसरपंच ग्रामपंचायत बोरामपल्ली, सतीश भांडारी, दरणी सामय्या, इरपा मडावी, पेद्दी नागेश, किरण वेमूला, आविसं सल्लागार रवी सल्लाम, नागराजू इंगली, अशोक इंगली,पोचाम अकुदारी,जनगम सडवली, राजू तोकला, महेंद्र माच्चावार, राकेश चुक्कावार, महेंद्र गांडूवार,मलाय्या चुक्कावार, रवी कुम्मारी,सन्नी जक्केवार संतोष गडपाल्ली, शेखर पात्याम,नरेंद्र गर्गम, आनंद जियाला, माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला, कार्तिक तोगाम, रवी भोयर, राकेश येलकुर्ती,जाकेवार श्रीनिवास, जाकेवार संतोष,शेशी चेनेली, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवारसह आविसंचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..!!