अहेरी तालुकासामाजिक

प्रत्येक दिव्यांग बांधवांनी ओळ्खपत्रासाठी शिबिराचे लाभ घ्यावं..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

नागेपल्ली :- निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात 18 ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अहेरी विधानसभेतील त्या-त्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणात फायदा घेऊन आपल्या वैश्विक ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांनी केले.9 मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मोदुमडगू येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात येणाऱ्या शिबिरातून दिव्यांग बांधवांना नक्कीच याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची, जिल्हा व तालुका प्रशासनाची त्यांनी स्तुती केली.प्राथमिक आरोग्य केंद्र मोदुमडगू येथे घेण्यात आलेल्या शिबिरात सर्व प्रवर्गातील एकूण 435 दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरामार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले. त्यापैकी अंदाजे 310 पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या ऑनलाइन पोर्टल द्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र आणि शासनाच्या विविध योजनांचे माहितीपत्रक स्पीड पोस्ट ने घरपोच देण्यात येणार आहे. तसेच लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य उपकरणे देण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण कोडापे,नगरसेवक प्रशांत गोडसेलवर,आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम,नागेपल्ली चे उपसरपंच श्री.शागोंडावार काका,नागेपल्ली ग्रा प सदस्य मलरेड्डी येमनूरवार,राजू दुर्गे सदस्य ग्रा.प.महागाव,वैकना कोडापे,अहेरीचे गटविकास अधिकारी अशोक कुरझेकर,कृषी अधिकारी प्रदीप राऊत,तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण वानखेडे,डॉ अलका उईके तसेच मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजीत राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close