Gamesअहेरी तालुका

सुद्धागुडम येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

✍️ अहेरी तालुक्यातील उमानूर ग्रा.प.अतंर्गत येणाऱ्या सुध्दागुड्म येथे जि.एस.के.क्लब सुध्दागुड्म यांच्या कडून भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक माजी पं.स.सभापती श्री.भास्करभाऊ तलांडे व शामराव गावडे,व तिसरा पारितोषिक मा.श्री विष्णु गेडाम असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्करभाऊ तलांडे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य,सुरेखाताई आलाम माजी पंचायत समिती सभापती अहेरी, ताराबाई आसाम माजी सरपंच,कविता कुमरी ग्रा पं सदस्य, प्रशांत गोडशेलवार नगरसेवक अहेरी, पोचम संपत काका प्रतिष्ठित नागरिक, तिरुपती अल्लूरी उपसरपंच, शामराव गावडे, लक्ष्मिस्वांमी अठ्ठेला प्र.ना. विष्णुजी गेडाम प्र. ना , शंकर गावडे, संजय पोरतेट माजी सरपंच, मल्लेश कोंडा, श्रीनिवास मडावी माजी सरपंच,आनंदराव कोंडागुर्ले,वसंत इस्टाम,बापू बेडकी,चंद्रय्या येलकुची,परशुराम नैनी, आलाम पाटिल काका मर्रीगुडम, झाडे काका, सडवली बेडकी, नारायण गांधरला, राजना सिंगणबयोनी, संध्या गावडे, जयराम आत्राम,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक होते.
तर कार्यक्रमाच्या संचालन व आभार प्रदर्शन श्री.चिरंजीव गांधार्ला यांनी केली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.लक्ष्मण वेलादी,उपाध्यक्ष श्री.अरुण सलपाला,सचिव प्रभाकर सलपाला,महेश येलकुचि,दशरथ आसाम,व गावातील पुरुष,महिला,खेळाडू उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close