चिरेपल्ली येथे वीर बाबुराव शेडमाके व सल्लागागरा स्मारकाचे उदघाटन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
📝अहेरी- धर्म आणि संस्कृती माणसाला जगण्याची दिशा देतात त्यामुळे प्रत्येक समाजातील लोकांनी आपले धर्म आणि संस्कृती चे चिकित्सक दृष्टीकोन तपासणी करून चांगल्या गोष्टीचे जतण केले पाहिजे, त्यातूनच येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार आपल्याला देता येईल असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केले. ते अहेरी तालुक्यातील चिरेपली येथील आदिवासी समाजाचा प्रतिक असणाऱ्या सल्लागागरा व वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मारकाच्या उदघाटन सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाला उदघाट्क म्हणून बीरस बिग्रेड राष्ट्रीय अध्यक्ष श्री.सतीशदादा पेंदाम होते.तर यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे, खाँदलाचे सरपंचा सौ.सुमन आलाम,राजारामचे सरपंच श्री.नागेश कन्नाके,मेडपली चे सरपंच श्री.निलेश वेलादी गटाचे सरपंचा जेट्टी मँडम सामाजिक कार्यकर्ता मौकाशी आणि मोठ्या संख्येने समाज बांधव यावेळी उपस्थित होते.