छल्लेवाडा येथील कॅन्सरग्रस्त महिलेला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी तालुक्यातील छलेवाडा येथे राहणाऱ्या पोचूबाई ही महिला कॅन्सर या दुर्धर आजराने ग्रस्त असल्याचे आणि त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांना पुढील औषधोपचार करने जड जात होते.महिलेच्या प्रकृतीची माहिती छलेवाडा येथील कार्यकर्त्यांकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्यांनी कॅन्सरग्रस्त महिला पोचुबाई कांबळे,यांना औषधोपचारा करिता आर्थिक मदत केली.पोचुबाई कांबळे मागील काही दिवसांपासून कॅन्सर या आजाराने पिडीत आहेत.घरची आर्थिक स्थिती खूपच बिकट असल्याने या दुर्धर आजारावरील महागडे औषधउपचार करणे त्यांना आवश्यक होते.
कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदत करतांना माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, विलास बोरकर, शंकर भसारकर , जिवन भसारकर, गुलाब देवगडे, नरेंद्र गर्गम, चिंटू पेंदाम, प्रकाश दुर्गे आदी उपस्थित होते.