बेज्जूरपल्ली येथील व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा....तालुक्यातील बेजूरपल्ली येथे बि.आर.एस क्लब कडून आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन नुकताच भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.
या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आविस सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम तर प्रमुख पाहुणे पोलीस पाटील सन्नी वेलादी,व्यंकटापूर सरपंच अजय आत्राम,गरकापेठा सरपंच सूरज गावडे,मादाराम माजी सरपंच इरपा मडावी,जाफ्राबाद सरपंच बिचमय्या कुडमेथे,आविस सिरोंचा शहराध्यक्ष रवी सुलतान,आविस सल्लागार विजय रेपालवार, बेजूरपल्ली ग्राप सदस्य लच्चा गावडे,ग्राप सदस्य शंकर गावडे,ग्राप सदस्य चिंन्ना गावडे,ग्राप सदस्य रवी वेलादी,जाफ्राबाद ग्राप सदस्य महेंद्र दुर्गम,आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,लक्ष्मण गावडे,चंद्रकांत मडावी सह आविसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित खेळाडू व नागरिकांना व्हॉलीबॉल या मैदानी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामीण व्हॉलीबॉल या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम व तृतीय पुरस्कार बामणी प्रभारी अधिकारी मस्के साहेब यांच्याकडून ठेवण्यात आले. बेजूरपल्ली येथील बि.आर.एस.क्लब कडून आयोजित व्हॉलीबॉल सामन्याचे यशस्वीतेसाठी रवी वेलादी,मुल्ला वेलादी,रामा वेलादी,सुंगा वेलादी, बीरा वेलादि, जोगा मडे, मुल्ला वेलादी,बोडका गावडे,क्रिष्णा मडे, यांनी परिश्रम घेतले. उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लिंगा वेलादी यांनी मानले.या उदघाटनीय सोहळ्याला बेजूरपल्ली सह परिसरातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थित होते.