कोरेल्ली खुर्द येथील मुले व मुलींचा कबड्डी सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
◆अहेरी◆:तालुक्यातील कोरेल्ली खुर्द येथे नवयुवक महिला क्रीडा मंड
ळाकडून
आयोजित भव्य ग्रामीण मुले व मुलींचा कबड्डी सामन्याचे उदघाटन नुकताच भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.
या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून पोलीस पाटील मादीजी तलांडी तर प्रमुख पाहुणे म्हणून पेरमिली माजी सरपंच प्रमोद आत्राम,मेडपल्ली सरपंच निलेश वेलादी,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,पेरमिली माजी उपसरपंच साजन गावडे,आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,प्रवीण रेषे,कवीश्वर चंदनखेडे,माजी ग्राप सदस्य लालसू पुंगाटी, लक्ष्मण तलांडे,सादु कोरसामी, कलकोटवार सर,झाडे सर,वाणी आत्राम,जया आत्राम सह उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित खेळाडू व नागरिकांना कबड्डी या मैदानी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. भव्य ग्रामीण मुले व मुलींचा कबड्डी या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून ठेवण्यात आले. कोरेल्ली खुर्द येथील नवयुवक महिला क्रीडा मंडळ कडून आयोजित कबड्डी सामन्याचे यशस्वीतेसाठी लालसू पुंगाटी, मनोज आत्राम,विनोद आत्राम,अजित गावडे,सरजू आत्राम,करण आत्राम,बिरजू आत्राम,लक्ष्मण तलांडी यांनी परिश्रम घेतले. उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कलकोटवार सर यांनी मानले.या उदघाटनीय सोहळ्याला कोरेल्ली खुर्द सह परिसरातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थित होते.