अहेरी तालुकाधार्मिक कार्य

ओड्डीगुडम येथील माहिलम्मा देवी बोनालु कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची सपत्नीक उपस्थिती

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत राजपूरपॅंच अंतर्गत ओड्डीगुडम येथे जय माहिलम्मा देवीच्या बोनालू पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ओड्डीगुडाम येथे महिलम्मा बोनालू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.महिलम्मा बोनालू कार्यक्रमाला लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक

अजयभाऊ कंकडालवार व अहेरी अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सोनालीताई अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून देवीची दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी महिलम्मा देवी कडे प्रार्थना केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता कूसनाके,माजी सरपंच रामुलू कुळमेथे,माजी सरपंच महेश सेडमाके,माजी उपसरपंच सुरेश गंगाधारीवार,माजी उपसरपंच पांडुरंग रामटेके,ग्रा.पं.सदस्य संतोष पंदीलवार,दिनेश मडावी,जांपन्न, मारोती अण्णा, महेश अण्णा,पोरतेट भाऊ,अजय नैताम,रविंद्रभाऊ,राकेश सडमेक,रवी भोयर,प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close