अहेरी तालुका

अहेरी नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी खोत यांच्यावर कडक कारवाईची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी नगरपंचायत अंतर्गत विकास कामांची ई-निविदा ,ऑफलाईन निविदा पद्धतीने कामाची टेंडर काढण्यात आले असता यात नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी दिनकर खोत यांनी टेंडर प्रक्रिया राबवितांना नगरपंचायतची स्थायी समितीला विश्वासात न घेता मुख्याधिकारी यांनी स्वतःहून मनमानी पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवून नियमबाह्य पद्धतीने निविदा उघडण्यात आले आहे. त्यानंतर नियमानुसार सदर विकास कामाच्या नोटीस बोर्डावार दिनांक 21/03/2023 ला दुपारी 3 वाजेपासून 27/03/2023 ला दुपारी 3 वाजेपर्यंत निविदा स्वीक्तृत अंतिम दिनांक व वेळ दिनांक 29/03/2023 शक्य झाल्यास निविदा उघडण्यात येईल याप्रकारे निविदा सूचना नोटीस बोर्डावर लावणे अनिवार्य असतांना प्रभारी मुख्याधिकारी खोत यांनी मात्र आपल्या मर्जीतील काही कंत्राटदारानां विश्वासात घेऊन सदर टेंडर प्रक्रिया चाणक्य नितीने नोटीस बोर्डावर नगरपंचायत पद्द्धिकारी व नगरसेवकांच्या अनुउपस्थितीत नोटीस बोर्डावर निविदा सूचना लावून नोट कॅमेरा व अप्लिकेशने विडिओ चित्रफीत काढून हेतूपूरस्पर निविदा लपवून पारदर्शकता न बाळगता कार्यालयीन कर्मचरी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना विश्वासत न घेता गोपनीय पद्धतीने निविदेची कार्यवाही पार पडली.त्यामुळे अनेक बेरोजगार कांत्राटदार यांना ई – निविदा व ऑफलाईन निविदा भरण्या पासून वंचित राहावे लागले.राष्ट्रीय व प्रादेशिक वर्तमान पत्रात निविदा प्रसिद्ध करण्या ऐवजी त्यांनी फक्त एक दोन लहानसा वृत्तपत्रात निविदेची जाहिरात देऊन हेतूपरस्पर विशिष्ट कांत्राटदाराना लाभ पोहचविण्याकरिता षडयंत्र रचण्यात आले.

विशेषतह नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात सी.सी टीव्ही कॅमेरा असतानाही ई निविदाच्या प्रक्रिया राबवण्यात हेतूपरस्पर सी.सी. टीव्ही कॅमेरा बंद ठेवून सदर निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आले. नगराध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच नगरसेवकांनी सी.सी टीव्ही कॅमेरा चालू ठेवण्यासं विनंती केले असता, तसेच शासकीय कार्यालयात कामाची पारदर्शता ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्येक शासकीय कार्यालयात सी.सी टीव्ही कॅमेरा सुरु ठेवणे बंधनकारक असूनही सदर निविदाच्या कालावधित हेतूपरस्पर कॅमेरे बंद ठेवण्यात आले. यावरून असे लक्षात येथे शासनाची दिशाभूल करून निविदा प्रतिक्रिया पार पाडण्यात आले यावरून सदर मा.मुख्याधिकारी दिनकर बाळाराम खोत यांचे मनमानी कारोभार सिद्ध होते. अशा भोंगळ कारभारामुळे नगरपंचयातची प्रतिमा मलीन होत आहे. सदर निविदा प्रतिक्रियेमध्ये गैर कारभार होत असल्याचे काही नोंदणीकृत कांत्राटदार यांनी तोंडी आक्षेप घेतले असता त्यांचे आक्षेपाकडे दुर्लक्ष करून ठराविक रित्या स्वतःचे बचाव करण्याकरिता दिनांक 2 रोजी सदर मुख्याधिकारी हे पत्रकार परिषद घेऊन केलेल्या गैर कारभारवार पांघरून घालण्याचा उद्देशाने प्रेसनोट जाहीर करून पारदर्शीकतेने काम करणार असल्याने स्वतःची गवगवा करून घेतले.या करीता संबंधित प्रभारी मुख्याधिकारी खोत यांची त्वरित उच्च स्तरीय चौकशी करून सदर होण्याऱ्या गैर कारभारास आळा घालून सदर प्रभारी मुख्याधिकारी यांनी एका आदिवासी लोकप्रतिनिधी महिलेचे अपमान केल्याने त्यांचे विरुद्ध कडक कारवाही करून त्यांची या आदिवासी जिल्ह्यातुन बाहेर बदली करण्यात यावी, तसेच नियमित मुख्याधिकारी तात्काळ नेमणूक करण्यात यावी, तसेच 7 दिवसाच्या आत संबंधित प्रभारी मुख्यधिकाऱ्यांवर कार्यवाही न झाल्यास आम्ही अहेरी नगरपंचायतचे पदाधिकारी व सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सामूहिक उपोषणवर बसणार असल्याची इशारा अशी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजर समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व नगराध्यक्ष व उपाध्यक्षबसह सर्व नगरसेवक यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली याना दिलेल्या निवेदनातुन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close