गडचिरोली जिल्हाराजकीय वृत्त

खासदार अशोक नेते व अजयभाऊ कंकडालवार या दोघांच्या भेटीने ‘अहेरी विधानसभा क्षेत्रात कहीं खुशी तर कहीं गम’….!

रवी सल्लम…..

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ….गडचिरोली….

मागील आठवड्यात 3मे रोजी बुधवारला गडचिरोलीचे खासदार अशोक नेते आणि आविसं नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार या दोन्ही दिग्गज नेत्यांची भेट झाली असून या भेटीत अहेरी विधानसभा क्षेत्रातल्या विविध राजकीय पैलूंवर गुप्त चर्चा झाल्याची माहिती मिळाली असून अचानक झालेल्या या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातल्या भाजपचे व्यक्तिनिष्ठा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये कहीं खुशी तर कहीं गमचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे.खासकरून खासदारांनी स्वतः होऊन अजयभाऊंची भेट घेतल्याची माहिती असून या दोघांमधील भेटीचे रहस्य मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहेत.

मागील महिन्यात अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता एकत्रित येऊन अभद्र युती करून निवडणूक लढविली.या निवडणुकीत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या आदिवासी विद्यार्थी संघ (कंकडालवार गटाने) अठरा जागांपैकी अकरा जागांवर कब्जा करत कंकडालवार हे स्वतः दोन्ही जागांवर निवडून आले.आणि दोन्ही पक्षानी एकत्रित येऊन अभद्र युतीचे केलेल्या पॅनेलचे त्यांच्या गटाने पराभव केले.बाजार समितीच्या या पराभवाच्या सावटातून भाजपचे व्यक्तीनिष्ठ कार्यकर्ते सावरत असतांनाच गडचिरोलीचे खासदारांनी स्वतः होऊन गडचिरोली येथे आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन अहेरी बाजार समिती निवडणुकीच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करून काही महत्वपूर्ण विषयांवर बरीच चर्चा केल्याची माहिती आहे. खासदारांनी कंकडालवार यांच्या अभिनंदन करून पक्षनिष्ठा बाळगण्याऐवजी व्यक्तीनिष्ठाची जप करणाऱ्या स्व:पक्षातील कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम तर केले नाही ना ? अशी खमंग चर्चा मात्र आता सगळीकडे होतांना दिसून येत आहे.

गडचिरोलीचे खासदार अशोक नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्यामधील गडचिरोलीतील गुप्त संवाद हे अद्याप बाहेर पडले नसले तरी खासदारांनी अजयभाऊंच केलेल्या अभिनंदन हे खासकरून अहेरी विधानसभा क्षेत्रात काही व्यक्तिनिष्ठा जपणाऱ्यां कार्यकर्त्यांना जिव्हारी लागल्याची खात्रीलायक माहिती आहे. दोन्ही नेत्यांच्या या गुप्त संवादातील माहिती अद्याप बाहेर पडले नसले तरी भविष्यात जिल्ह्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमधून या संवादाची गोपनीयता बाहेर पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close