इंदारम येथील समाज मंदिराचे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न !
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
▪️अहेरी:-ग्रा.प.इंदाराम येते आदिवासी समाज जास्त संख्यने वास्तव्यास आहेत मात्र समाजाच्या सांस्कृतीक तथा परम्परागत रूढी परंपरा,चालीरीती यांचे जोपासना करण्यासाठी व कार्यक्रम घेण्यासाठी समाजाच्या समाजभवन नसल्याने अडचण होत होती.
आदिवासी समाजातील नागरिकांनी जागा उपलब्ध असल्याने सदर जागेवर सांस्कृतीक समाजभवन उभारून दिल्यास समाजाचे कार्यक्रम घेण्यास सोईचे होईल व आम्हच्या समाजाच्या सांस्कृतीक विकासालाही चालना मिळेल.म्हणून या उद्देशाने समाज बांधव माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडे नागरिकांनी समाज भवनाची मागणी केले होते.आपण नेहमीच सर्व समाजाला मदत करत आले असून इंदाराम येते आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने समाज भवन आवश्यक असून मि शब्द देतो कि येत्या काही दिवसांतच समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते.
जिल्हा परिषदेच्या 13 वने अंतर्गत सन 2021-2022 मध्ये निधी मंजूर केले असुन आज या समाज मंदिर बादकाम पूर्णत्वास आल्याने सदर समाज भवनाचा माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी मा.अजयभाऊ नैताम माजी जि.प.सदस्य,सौ.वर्षा प्रल्हाद पेंदाम सरपंच इंदाराम, वैभव कंकडालवार उपसरपंच इंदाराम,गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.प.सदस्य इंदाराम,सदस्य गण विनोद आलाम,शाकिर शेख,सौ.सपना कोरेत,कविता सोयाम,जयाबाई तेलंगे,शालिनी काबळे,प्रकाश दुर्गे,शामराव मडावी,मुस्लि तलांडे,पांडुरंग तोर्रेम, बापूजी सिडाम,सत्यवान मडावी,नामदेव तलांडे,दिलीप मडावी,गंगाराम पोरतेट,साईनाथ कोरेत,संपत कोरेत,आनंदराव गोस्कुर,संतोष कोडापे,विश्वेशराव कोरेत,नामदेव तोर्रेम,विनायक सडमेक,मायाताई कोरेत,लक्ष्मीबाई तलांडे,गिरजाबाई मडावी,अरुणा कोरेत,बबिता आत्राम,शांताबाई कोरेत,सोनी सोयाम तसेच आ.वि.स तथा अजयभाऊ फ्यान्स क्लब चे कार्यकर्ते व गावातील नागरिक व पदादिकारी उपस्तित होते.