अहेरी तालुका

तोडगट्टा येथे सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांना मार्गदर्शन करा …!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

आल्लापल्ली: एटापल्ली तालुक्यातील गट ग्रामसभा गर्देवाडा कडून तोडगट्टा येथे विविध मागण्यांसाठी मागील अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून त्या आंदोलनामध्ये आपण येऊन आंदोलकांना मार्गदर्शन करून आवश्यक सहकार्य करण्याची विनंती गर्देवाडा येथील गट ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना त्यांच्या आलापल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन निवेदनाद्वारे विनंती केले.
यावेळी माजी आमदार आत्राम यांनी ग्रामसभा आंदोलनाची सविस्तर माहिती जाणून घेत ग्रामसभा पदाधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद दिले.
माजी आमदार दिपक दादा आत्राम यांना निवेदन देतांना गर्देवाडा येथील ग्रामसभेचे अध्यक्ष रमेश महा,माजी जि.प.सदस्य चुंडू दोरपेटी,दिनेश गावडे,अडवे गोटा,सादु दोरपेटी,राजू आत्राम,वुडगा पल्लो, नवलु दोरपेटी,राजू कोडो, रामजी गोटा आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close