धान खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांची उन्हाळी धान खरेदी करा ….अन्यथा आंदोलन…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …
गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळी हंगामातील धान अद्याप आदिवासी विविध सहकारी सोसायटीमार्फत खरेदी करण्यात न आल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना मध्ये सरकरप्रति तीव्र नाराजी व असंतोष पसरलेलं आहे. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिकांची अतोनात नुकसान झाले होते.असे असतांनाही कुठे ही धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली नाही.
उन्हाळी धान खरेदी करण्यासंदर्भात माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्याशी भ्रमणध्वनिवरून संवाद साधून येत्या दोन चार दिवसांत सगळीकडे धान खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहीती आहे.
तरीही येत्या दोन -चार दिवसात जर उन्हाळी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळी धान आदिवासी विविध सहकारी सोसायटी मार्फत धान खरेदी न केल्यास धान उत्पादक शेतकरी,शेतमजूर व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकशाही पध्दतीने आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली आहे.