अहेरी तालुकासामाजिक
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून वेलगूर, आल्लापल्ली व नागेपल्ली येथील आपद्ग्रस्तांना उपचारासाठी आर्थिक मदत
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी :- तालुक्यातील वेलगुर,नागेपल्ली व आलापल्ली येथील आपद्ग्रस्तांना उपचारासाठी आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी त्यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात आपद्ग्रस्तांना बोलावून रुग्णालयात जाऊन पुढील उपचारासाठी आपल्या परीने आर्थिक मदत केली. आलापल्ली येथील शेख कासम शेख अब्बास नागेपल्ली येथील मंगेश गुळदे आणि वेलगुर येथील मनीराम कासेवार यांना उपचारासाठी आर्थिक मदत दिली. यावेळी तिन्ही कुटुंबियांनी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे मदतीबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानले. वरील तिन्ही गावातील आपद्ग्रस्तांना उपचारासाठी आर्थिक मदत करतांना तिन्ही गावातील आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.