आपापल्ली येथील विकासकामांचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : तालुक्यातील ग्राम पंचायत वांगेपल्ली अंतर्गत येणाऱ्या आपापली गावात जिल्हा परिषद गडचिरोली कडून विकास कामाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.आपापली गावात दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यात चिखल होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करत मार्ग काढावा लागत होता.ही बाब वांगेपल्ली येथील सरपंच दिलीप मडावी यांनी आविस तथा अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना सांगितले असून रस्त्याचे समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे कामाची पाठपुरावा करून प्रधानमंत्री आदर्श योजनेतून आपापल्ली गावात 10 लाखाच्या निधीचे नाली व रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिले. या कामांचे भूमिपूजन आविसं,अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आले.यावेळी वांगेपल्लीचे सरपंच दिलीप मडावी होते.विशेष अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता कुसनाके होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच किस्टापुर वेल अशोक येलमुले,
ग्रा.प.सदस्य महागाव राजेश दुर्गे,श्रीनिवास आलाम माजी उपसरपच तथा विद्यमान सदस्य ग्रा.प.महागाव,गणेश चौदरी,अश्विनी दुर्गे ग्रा.प.सदस्य वांगेपल्ली,हणमंतू नैताम ग्रा.प.सदस्य वांगेपल्ली,महेश नैताम,बाबुराव नागापुरे,महादेव झाडे,गौतम झाडे,मनोहर दुर्गे,मारोती ओंडरे,वासुदेव दुर्गे,विनोद रामटेके,अरफाज शेख,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परीवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते