तानबोडी-बोटलाचेरू रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे…संबंधित कंत्राटदारावर कारवाई करा …!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी….तालुक्यातील तानबोडी – बोटलाचेरू या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे.संबंधित कंत्राटदारांनी या रस्त्याचे काम भर पावसाळ्यात सुरू केल्याने व सदर रस्ताचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याने सदर रस्ता आता किती दिवस ठिकणार आहे ? असं प्रश्न उपस्थित होत आहे. डांबरीकरणाचे रस्ता बनवत असताना रस्त्याची खोदकाम करून गिट्टटी टाकून त्यानंतर डांबरीकरण करावे लागत असतात मात्र या पद्दतीने रस्त्याचे काम न करता कंत्राटदारांनी या रस्त्यावर सरळ सरळ डांबरीकरणाची काम करत आहेत. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने टाकलेली डांबर उखडून जात आहे. या रस्त्यावरून वाहतूक केल्यावर रस्त्यावर भेगा पडत आहेत.त्यामुळे सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने संबंधित विभागानी या कामाची स्वतंत्र पथकामार्फत योग्य चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर योग्य कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडावार यांनी केली आहे.