राज्यातील 14 कोटी जनतेच्या हितासाठी काम करू-विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी विरोधी बाकावरील काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाचे विरोधी पक्षनेते पदी निवडी संदर्भातील पत्र विधानसभा अध्यक्ष यांचेकडे देण्यात आले होते. आज सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षाकडून विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सभागृहात घोषणा होताच अतिशय सामान्य कुटुंबातील व्यक्ती पक्षातील एक सामान्य कार्यकर्ता ते वन विकास महामंडळ अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री व सलग दोनदा राज्याचे विरोधी पक्ष नेते असा यशस्वी प्रवास गाठणाऱ्या नवनियुक्त विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे पक्ष सहकारी व सत्ताधाऱ्यांकडून कौतुकांचा वर्षाव करीत अभिनंदन करण्यात आले. तर राज्यातील 14 कोटी जनतेच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे प्रतिपादन करून नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सर्वांचे आभार मानले.