सिरोंचा तालुका

कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदारसंघातल्या धावत्या बसेसची छत आता हवेत उडणार नाही …?

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

रवी सल्ल

सिरोंचा....एका हातात आपली थैली अन दुसऱ्या हातात चक्क छत्री धरून गळख्या बसमधून प्रवास करण्याचं योग आमचं प्रवाश्यांना आलयं, चक्क धावत्या बसची छत हवेत उडत असतानांही जीवाची पर्वा न करता लालपरीतून प्रवास करण्याचं योग ही आमचंच प्रवाश्यांना लाभला.अन भरं पावसात धावत्या बसची एका चालकाकडून एका हाताने वायपर तर दुसऱ्या हाताने स्टेरिंग चालवित असतांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याचं योग सुद्धा आमचं प्रवाश्यांनी अनुभवलं.अन हे सगळं भयावह प्रकरण काही दिवसांपूर्वी अहेरी आगारातून सुटणाऱ्या बसेसमुळे घडून आलयं.अन या भयावह प्रकरणांची प्रसारमाध्यमां मधून सर्वस्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर अहेरी आगाराने प्रवाश्यांची थोडाफार का होईना काळजी घेत गळक्या व भंगार अवस्थेत असलेल्या बसेसची छत आता हवेत उडू नये आणि पावसात बसेस गळू नये,म्हणून बसेसच्या छतांना वेल्डिंग करून पॅचेस मारण्याचे काम हाती घेतल्याचे अहेरी आगाराच्या एका बसच्या छताला वेल्डिंग करून पॅचेस मारल्याचे दिसून आले आहे.

नेहमी गळक्या व भंगार अवस्थेत असलेल्या बसेसमुळे आणि याच आगाराचे एका धावत्या बसची छत हवेत उडाल्याने सर्वदूर चर्चेत आलेली अहेरीची एसटी आगार हे दस्तरखुद्द राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री व माजी परिवहन राज्यमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचं प्रतिनिधित्व असलेल्या मतदारसंघातील असून अहेरी ही त्यांची जन्म व कर्मभूमी सुद्धा आहेत...हे विशेष.

सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून तर शहरापर्यंत जोडणारी ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे.अनेक पाडे अन खेड्यापासून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणून एसटी बसेसकडे पाहिल्या जात असतात. सुरक्षित आणि अपघातविरहीत बससेवा,आवडेल तेथे कोठेही प्रवास,गाव तेथे एसटी,रस्ता थिते एसटी,असे अनेक ब्रीदवाक्य घेऊन सर्वसामान्य प्रवाश्यांच्या सेवेसाठी उतरलेल्या एसटी सेवा अहेरी आगाराकडून सिरोंचा तालुक्यातील प्रवाश्यांसाठी मात्र काही वर्षांपासून कुचकामी ठरू लागलंय.

अहेरी आगारातुन सोडणाऱ्या बसेसच्या योग्य नियोजनाअभावी या भागातील प्रवाश्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून वेळप्रसंगी प्रवाश्यांना खाजगी वाहनांने जीवघेणा प्रवासही करावं लागतं आहे. एकीकडे राज्यात सगळीकडे राज्य परिवहन महामंडळाकडून शिवशाही,शिवनेरी,स्लीपर कॉअच आरामदायी व निमआरामदायी,सर्वसाधारण सुस्थितीत असलेल्या दर्जेदार बसेस चालवत प्रवाश्यांना आरामदायक सेवा देत आहे तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराने कोरोना काळापासून आजतागायत निव्वळ रस्ता खराब असल्याचं एकमेव कारणं समोर सिरोंचा मार्गावर गळख्या व भंगार अवस्थेत असलेल्या बसेस सोडण्यात येत आहे. अहेरी आगाराकडून सिरोंचा मार्गासाठी सोडणाऱ्या गळख्या व भंगार बसेसची अवस्था भयावह असून या बसेसमध्ये अंतर्बाह्य सखोल स्वच्छता नसतात,काही बसेसमध्ये खिडक्याच समोर सरकत नाही,आसनं व्यवस्था सुद्धा फाटलेली सारखं असतात.सिरोंचासाठी सोडणाऱ्या अनेक बसेसची रंगसुद्धा उडालेली असले तरी बसेसची रंगरंगोटी करण्याचं प्रश्नच कधीही अहेरी आगरासमोर उद्भवत नाहीये.?

याउलट सिरोंचा तालुक्यातील प्रवाश्यांच्या सेवेसाठी व सोयसुविधेसाठी शेजारचे तेलंगणा व छत्तीसगड मधून स्वच्छ,सुंदर व रंगरंगोटीच्या चकाकीने चमकणाऱ्या बसेस सोडण्यात येत आहे.शेजारच्या राज्यांमधील बसेसच्या चकाकीत आमचं आगाराचे बसेसची रंगरंगोटी हे कुठंतरी लोप पावतांना दिसून येत आहे. अख्या राज्यातच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला नफ्यात आणण्याचं अविरत प्रयत्न करणारे एसटीचे संचालक मंडळ आणि राज्याचे परिवहन मंत्र्यांचे मात्र अत्यंत बिकट परिस्थितीतून 'नाईलाजास्तव' मार्गक्रमण करणाऱ्या दक्षिण टोकावरील अहेरी या एकमेव आगाराकडे वर्षानुवर्षे लक्ष वेधू नये,हे मात्र एक कोडेच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close