अहेरी तालुका

आदिवासी दिनानिमित्य अहेरीचे एसटी आगारात महापुरुषांना अभिवादनाचे कार्यक्रम संपन्न…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : एस.टी.महामंडळाच्या अहेरी आगारात एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेतर्फे ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अविस नेते अजय कंकडालवार होते.यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रांतिकारक, भगवान बिरसा मुंडा,वीर बाबुराव शेडमाके तसेच छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या फोटोंना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.आदिवासी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असून त्यांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे यावेळी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती,अहेरी आगार अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार म्हणाले.यावेळी त्यांनी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व एस.टी.कर्मचाऱ्यांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिले.यावेळी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच एसटी आगाराचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close