भावसार समाजातील गुणवंत विध्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा संपन्न
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
चंद्रपूर:-भावसार युवा एकता महिला आघाडी व भावसार समाज महिला फाउंडेशन चंद्रपूर तर्फे समाजातील प्राविण्य मिळवीलेले दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या मातापित्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अलोक साधनकर, राजेश कळमकर, कमलताई अलोने, प्रशांत भावसार, मीनाक्षी करिये, प्रशांत माळोदे, मीनाक्षी अलोने योगिता धनेवार,सतीश वायचोळ, दिलीप झाडे, अभिलाषा मैंदळकर आदी उपस्थित होते. वर्ग दहावीचे विद्यार्थी ओम सुतवणे, कु दिव्या लखदिवे, कु भार्गवी जोगी, कु ऋतुजा बरडे, कु तन्वी मैदळकर, सोहम जांगडे, अनिकेत मुधोळकर, तसेच बारावीचे विद्यार्थी कु गार्गी धनेवार, रोहन बोडखे संकल्प साधनकर, ओम बनसोड, आभास मुकुवाने, उत्कर्ष सहारकर, यांना शिल्ड प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आलोक साधनकर आपल्या संबोधनात म्हणाले विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आपल्या डोळ्यासमोर निश्चित लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जो लक्ष गाठेल तोच होतो विजयी. सत्कार तर होतातच परंतु समाजातील वरिष्ठांच्या हस्ते तेही गुणवंत विद्यार्थ्यांसोबत आई-वडिलांचा सत्कार यात वेगळाच आनंद असतो. तो आनंद आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसतोय. बारावीचा विद्यार्थी आभास मुकवाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन दीपा गोजे प्रास्ताविक अभिलाषा मैंदळकर तर आभार प्रदर्शन समीक्षा लखपती यांनी केले.कार्यक्रमाला भावसार समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.