आता स्वतंत्र सिरोंचा जिल्हा निर्मितीची मागणी जोर धरू लागलंय…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….
सिरोंचा… स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिरोंचा तालुक्यातील नागरिकांनी येथील तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांना व आमदार ,खासदारांना निवेदन सादर करून गडचिरोली जिल्ह्याचे त्रिभाजन करून नव्याने स्वतंत्र सिरोंचा जिल्हा निर्माण करण्याची मागणी केली आहे. सादर मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मधूसुदन आरवेल्ली, सुरज दुदीवार व किरणकुमार वेमुला यांच्या नेतृत्वात नागरिकांकडून निवेदन देण्यात आले.
स्वतंत्र सिरोंचा जिल्हा निर्मितीसाठी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि,सिरोंचा हे गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 220 किलोमीटर व चंद्रपूर जिल्हापासून जवळपास 220 किलोमीटर अंतरावर आहे. सिरोंचा हा पुर्वी ब्रिटीश कालीन जिल्हा होता स्वातंत्र मिळाल्यानंतर सिरोंचा ला तहसिल बनविण्यात आले. तेव्हा पासुन सन 1981-82 पर्यंत चंद्रपुर जिल्हा मध्ये सिरोंचा तहसिलचा समावेश करण्यात आला. सन 1981-82 मध्ये नविन गडचिरोली जिल्हाची निर्मिती करून सिरोंचा तालुक्याची गडचिरोलीत समावेश करण्यात आला.
1) आजसुद्धा या तालुक्यातील लोकांचे त्रास कमी झालेला नाही. कारण सिरोंचा ते चंद्रपुर व सिरोंचा ते गडचिरोली अंतर कमीजास्त सारखेच आहे. 215 कि.मी. आहे.
2) पुर्वी सिरोंचा तहसिल मध्येच अहेरी, भामरागड, एटापल्ली, तहसिल कार्यक्षेत्राचा समावेश होता. सन 1981-82 ला सिरोंचा ला जिल्हा करूण अहेरी एटापल्ली भामरागड या तहसिल कर्यक्षेत्राचा समावेश करून सिरोंचाला जिल्हा बनविले असता तर आज सिरोंचाचे विकास झाले असते. 3) पुर्वी सिरोंचा विधानसभा मतदार संघ होता पण सिरोंचाचे लोकप्रतिनिधीचे उदासिनतेमुळे सिरोंचाचे मतदार संघ अहेरी मतदारसंघ म्हणून घोषित केले, हे सिरोंचावर खूप मोठा अन्याय करण्यात आले आहे.
4) सिरोंचात पुर्वी उपविभागीय अधिकारी महसुल यांचा कार्यालय होता ते कार्यालय अहेरीला हलविण्यात आले आहे. यामुळे सिरोंचाचे विकास खुंटलेला आहे. हे सर्व अन्याय दुर होण्यासाठी सिरोंचाला आता स्वतंत्र नवीन जिल्हा बनविने आवश्यक आहे.
5) सिरोंचा तालुक्यातील पातागुडम, कोर्ला, कर्जेल्ली, ते गडचिरोली जिल्हयाचे अंतर 300 कि.मी.जास्त आहे. जिल्हा क्षेत्र
लांब असल्यामुळे कामाकरिता जाण्यासाठी एक ते दोन दिवस प्रवासाला लागते. जर सरकारने सिरोंचाला स्वतंत्र जिल्हा
बनविले तर पातागुडम, कोर्ला, कर्जेल्ली सारखे दुर्गम भागाचे झपाट्याने विकास होणार आहे.6) सिरोंचा तहसिलचा अंतर राज्याचा सिमानुसार छत्तीसगड, महाराष्ट्र, व तेलंगाणाचा मध्यवर्ती ठिकाण पडते त्यामुळे या तीन राज्यांच्या मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सिरोंचाला अग्रक्रमाने प्राधान्य देऊन
जिल्हा बनवावे. 7) सिरोंचा जिल्हा बनविल्यास सिरोंचा तहसिल मधील लोकांसह सिमावर्ती आंतरराज्य लोकांना देखील सवलतीचा होणार आहे, या दृष्टीने सिरोंचा जिल्हा बनविने उत्तम आहे. म्हणून सिरोंचाला जिल्हा बनवावे. 8) सिरोंचाला जिल्हा बनविल्यास सिरोंचा तहसिल मधील सर्व सुशिक्षित व अशिक्षितांना
रोजगारीचा संधी उपलब्ध होते. स्थानिकांचे रोजगारीचे प्रश्न मिटते हयाही दृष्टीने विचार करून सिरोंचाला जिल्हा बनवावे.
9) सिरोंचा पासुन 60 कि.मी. अंतरावर तेलंगाणाचे दोन मोठे जिल्हे आहेत तरी त्या जिल्हयांचा विकास सदर गडचिरोली जिल्हयाचा तुलनेत विकसनशिल आहे. त्यामुळे सिरोंचा तहसिलच्या लोकांना तेलंगणाकडे कल वाढत असल्यामुळे उत्तरोत्तर तेलंगाणात सम्मीलीत होण्याचे प्रस्ताव उत्तरोत्तर वाढू शकते च्या कारणामुळे वेळा प्रसंगी आंदोलन करण्याचा शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. कृपया गंभीर मुद्दाबाबत विचार करून सिरोंचाला जिल्हा बनवावे.10) अहेरी जिल्हा बनविण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे म्हणुन कळला आहे. अहेरी जिल्हा बनविले किंवा नाही बनविले तरी मात्र कृपया सिरोंचाला जिल्हा बनवावे. व्यापारी दृष्टीकोणातुन सिरोंचाला जिल्हा बनवावे. व्यापारी दृष्टीकोणातुन सुध्दा सिरोंचा अंतरराज्यामध्ये मध्यवर्ती स्थान असल्याने व्यापार संबंध वाढते. लोकांना सर्व वस्तु वाजवी दरामध्ये उपलब्ध होऊ शकते याचाही विचार करूण सिरोंचाला जिल्हा बनवावे.
11) सिरोंचा येथून अंतरराज्य वाहतुक सुरळीत होण्यासाठी सिरोंचाला जिल्हा बनविल्यास सिरोंचा येथे जिल्हा स्तरीय बस आगार प्रस्तापीत होईल ज्यामुळे अंतरराज्य आवागमन सुरळीत होऊन सिरोंचाचे आर्थिक स्थिती लोकाभिमुख होईल याचाही विचार करून सिरोंचाला जिल्हा निर्माण करावे.12) सिरोंचा क्षेत्र दुर्गम व मागासलेला क्षेत्रात मोडत असल्यामुळे जल्द विकास होण्यासाठी दुर्गम भाग व दुरच्या भागाला प्रथम प्राधान्य देऊन सिरोंचाला जिल्हा घोषित करावे अशी सर्वाचा आग्रहाची मागणी आहे. कृपया सिरोंचाला जिल्हा बनवावे.13)सिरोंचा जवळ 6 कि.मी. अंतरावर कालेश्वर देवस्थान आहे. व 40 कि.मी. अंतरावर सोमनुर येथे त्रिवेणी संघम आहे. त्यामुळे तिर्थ यात्रा व पर्यटनाचा दृष्टीने विकासाचा दृष्टीने विचार करून सिरोंचाला जिल्हा बनवावे हि विनंती.14) वैद्यकिय सेवेचा दृष्टीने गंबीर आजाराचा निराकारणासाठी उत्कृष्ट असे वैद्यकिय तज्ञयुक्त मोठा उपचार केंद्र असावे या मुळे उपचारासाठी तेंलगाणा राज्यात जातात त्यांना प्रवासाचा व आर्थिक त्रास होतो सिरोंचाला जिल्हा बनविल्यास जिल्हयाचा ठिकाणी मोठा दवाखाना होते व इकडचा लोकांना परराज्यात उपचारासाठी जाण्याचा वेळ येणार नाही. कृपया सिरोंचाला जिल्हा बनव्हावे.15) सिरोंचा क्षेत्रात वन व खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आहे. त्याचा योग्य प्रमाणात व प्रमाणशीर उपयोग करून घेता येईल कृपया याचा फायदा महसुल स्वरूपात शासन व लोकांना लाभते याचाही पुरेपुर विचार करून सिरोंचाला जिल्हा बनवावे हि विनंती. 16) सिरोंचाचे भौगोलीक परिस्थीतीचा विचार केल्यास नदी नाले डोंगर वन विद्युत पुरवठा व बि.एस.एन.एल टावरचा समस्यामुळे कवरेज व नेट नेहमी खंडीत होत असते. सिरोंचाला जिल्हा बनविल्यास याच्या तोडगा लवकर निघतो समस्या आपोआप दुर होऊ शकते याचा विचार करून सिरोंचाला जिल्हा बनवावे.
17) शिक्षणाचा दृष्टीने सुध्दा सिरोंचा मागे आहे. सिरोंचा येथे वैद्यकिय पदवी तसेच उच्छ शिक्षणाचे मोठा महाविद्यालयाचा कमतरता आहे. याचा विचार करून सिरोंचाला जिल्हा बनविल्यास भावी पिडीला सुध्दा शिक्षणासाठी बाहेर गावाला जाऊन उच्छ शिक्षण घेण्याचा वेळ येणार नाही. सिरोंचा जिल्हा बनविन्यास या सुविध मिळण्याचा हक्क बनते या दृष्टीने विचार करून सिरोंचाला जिल्हा बनवावे हि आग्रहाची विनंती आहे.
18) मुख्य गडचिरोली जिल्हा पासुन अंतर राज्याचा सिमा दुर व दुर्गम भागात असल्याने दुर व दुर्गम भागाला प्राधान्य अग्र देऊन सिरोंचा तालुका वासीयांचा मागणीला रास्त मागणीकडे आपण
कृपया व्यक्तीशा लक्ष देऊन सिरोंचाला जिल्हा बनवावे हि विनंती. 19) सिरोंचाला ब्रीटिश कालीन जिल्हया म्हणून इतिहास आहे तसेच स्वतंत्र प्राप्त झाल्यानंतर या प्रथम तहसिल म्हणूनही इतिहास आहे,अशा विशेष दर्जा प्राप्त सिरोंचा तहसिल विकासाचा दृष्टीने खूप मागे आहे
याला एकच उपाय म्हणजे सिरोंचाला जिल्हा बनविने या इतिहासाचा दखल घेवुन सिरोंचाला जिल्हा बनवावे.
20) सिरोंचा तालुक्यात 148 गावे आहेत तसेच सिरोंचा तालुक्याला लागुण असलेला अहेरी व भामरागड तालुक्यातील काही गावांचा समावेश करून सिरोंचा तालुकाला जिल्हा घोषीत करावे व आसरअल्ली, झिंगानूर, रेगुंठा, रेपनपल्ली, जिम्मलगट्टा व मन्नेराजाराम या सहा ठिकाणी तालुका मुख्यालय बनविल्यास त्वरित विकास होऊन लोकांचा जिवनमान सुधारेल व लोकांचे
अनावश्यक व आर्थिक बोजा कमी होईल याचाही विचार करून गडचिरोली जिओह्याचे त्रिभाजन करून नव्याने सिरोंचाला स्वतंत्र जिल्हा बनवावे. राज्यसरकारने निवेदनात नमूद केलेल्या 20 मुद्यांवर सकारात्मक विचार करून मागील अनेक वर्षांपासून सिरोंचा तालुक्यातील लोकांवर होत असलेल्या अन्यायाचे गंभीरपणे दखल घेऊन आणि निवेदनावर गांभीर्याने विचार करून सिरोंचाला नविन जिल्हा बनविण्यासाठी अग्रक्रम देऊन सिरोंचाला त्वरीत जिल्हा बनवण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.