सिरोंचा तालुका
वडधम येथील तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
◆सिरोंचा◆:तालुक्यातील वडधम येथील आविस सल्लागार तथा बाजार समिती संचालक आकुला मल्लिकार्जुन यांचे जेष्ठ बंधू आकुला पेद्दामल्लय्या यांची काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने अचानक दुःखद निधन झाले होते.
या निमित्य तेरवी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहून आकुला कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी आविस सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम,गरकापेठा सरपंच सुरज गावडे,गणेश रच्चावार,राकेश येलकुर्ती,राजू कडार्ला,श्रीनिवास येलपुला,शेखर गौतम,जुलेख शेख,माजी सरपंच विजय कुसनाके,संदीप बडगे,चंद्रमोगली मडेम सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.*