सिरोंचा येथे तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा : वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून याला जबाबदार केंद्रातील भाजप आणि राज्यातील ED सरकार आहे. या सरकारच्या हुकुमशाही धोरणामुळे अनेक स्वायत्त संस्थांचे अधिकार हिरावल्या जात असून त्यामुळे संविधानाची पायमल्ली केल्या जात आहे. जाती जातीत – धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. यामुळे विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, लघु व्यापारी, सर्व त्रस्त असून या हुकमशाही सरकारच्या हिटलरशाही धोरणाचा परदाफास करून जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस च्या वतीने राज्यभरात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले, विरोधी पक्ष नेते माजी मंत्री आ.विजयभाऊ वड्डेट्टीवार, अखिल भारतीय स्तरावरील नेते मंडळी ,आमदार अभिजित वंजारी ,आमदार सुधाकर अडबाले तसेच प्रदेश स्तरावरील नेते मंडळी सहभागी होणार आहेत. या पदयात्रेची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यात 3 सप्टेबर 12 सप्टेंबर पर्यंत होणार आहे.सिरोंचा तालुका जनसंवाद यात्रा बाबत नियोजन बैठक तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीश जवाजी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी कांग्रेसचे जेष्ठ नेते व माजी आमदार पेंटा रामा तलांडी,महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधि सुगुना तलांडी,माजी सरपंच रत्नमाला मासनुरी,जेष्ठ नेते अहेमद अली,अब्दुल सलाम,बानय्या मंचार्ला ,माजिद अली, शेख जलील,
युवा कांग्रेस जिल्हा सचिव नवशद हैदर शेख,आदी कांग्रेस कार्यकर्ते उपस्तीत होते.