सिरोंचा ते असरअल्ली मार्गासाठी सोडणारे भंगार बसेस बंद करून नवीन बसेस उपलब्ध करून द्या…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा…. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग व शेवटचं टोकं म्हणून सिरोंचा तालुक्याला सर्वत्र ओळखले जातात. सदर तालुका ही अहेरी विधानसभा क्षेत्रात मोडतात.
या तालुक्यात अहेरी बस आगरांतर्गत प्रवाश्यांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी दररोज दोन चार बसेस सोडण्यात येत असतात. सिरोंचा तालुका मुख्यालयातून आसरअल्ली गावापर्यंत सोडण्यात येणारी मानव विकास मिशन अंतर्गतचे बसेस ही भंगार अवस्थेतले असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह येथील प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
आज रोजी बुधवारला मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी असरअली या रस्त्यावर चालणारी भंगार बस आज अचानकपणे राजीवनगर या गावाजवळ या बसची गेयर बॉक्स लीक होऊन चालत्या बस अचानक रस्त्यावर बंद पडून बसमधून धूर निघू लागल्याने बसमधील शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावं लागला आणि काही वेळ विध्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती या बसमधून प्रवास करणारे विध्यार्थ्यांनी येथील सामाजिक कार्यकर्ता व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांना भ्रमणध्वनी वरून देताच त्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून बसची पाहणी करून बसचे चालक वाहक यांना योग्य सहकार्य केले.विशेष म्हणजे याबसमध्ये अंकिसा व असरअल्ली या परिसरातील शालेय विद्यार्थी प्रवास करीत होते. सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण भागात सोडणाऱ्या भंगार बसेसमुळे अश्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अहेरी बस आगाराने सिरोंचा व असरअल्ली या मार्गावर नवीन बसेस सोडण्याची मागणी सागर मुलकाला यांनी केली आहे.