किष्टापूर येथील अपघातग्रस्त अलोणे कुटुंबाला उपचारासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : तालुक्यातील किस्टापूर येथील मदनय्या अलोणे यांना काही दिवसा अगोदर अपघात झाले होते.त्यांनी तेलंगणातील करीमनगर येथे एका खाजगी दवाखान्यात भरती होऊन उपचार घेत आहे.अलोणे यांची घरचा परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांना दवाखान्यात औषध व उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण भासत होते.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना गावातील नागरिक तसेच कार्यकर्त्यांना कडून माहिती मिळताच त्यांनी अलोणे कुटुंबाचे नातेवाईक संतोष दुर्गे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून मदनय्य अलोणे यांची प्रकृतीची माहिती जाणून घेतली.कार्यकर्त्याने अलोणे यांची कुटबाची आर्थिक परिस्थिती सांगितल्यानंतर माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी तेलंगणात उपचार घेत असलेल्या मदनय्या अलोणे यांना क्षणाचाही विलंब न करता ऑनलाईन ( Phone pe )द्वारे औषध उपचाराकरीता आर्थिक मदत केली.यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य तो मदत करेन म्हणून अलोणे कुटुंबियांना मोठा धीर दिला. या आर्थिक मदतीविषयी किष्टापूर येथील अपघातग्रस्त अलोणे कुटुंबातील सदस्यांनी अजयभाऊंचे आभार मानले.