अहेरी तालुका
जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून मोद्दुमडगू येथील रंजीत हलदर यांची तब्यतीची विचारपूस..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोद्दूमडगू येथील जेष्ठ नागरिक रंजितकाका हलदार यांना काही दिवसापूर्वी अपघात झाले होते.रंजीत हलदार हे उपचार घेऊन दवाखान्यातुन घरी आल्याने त्यांची आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मोद्दूमडगू येथे हलदार यांचे घरी सदिच्छा भेट देऊन त्यांची तब्यतीची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी उपस्थित नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे,ग्रामपंचायत सदस्य तथा अहेरी बाजार समिती संचालक राकेश कुळमेथे,ममता मडावी,राॅय मनान मामू,ग्रामपंचायत सदस्य बेबीताई मंडल,ग्रामपंचायत संग अध्यक्ष प्रेमीला मिस्त्री,शोभा हकदारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते तसेच हलदार परिवाराचे सदस्य उपस्थित होते.