चंद्रपुर जिल्हासामाजिक

मोबाईल ठरतोय कुटुंबातील खलनायक ..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क..
चंद्रपूर :-सध्याच्या काळात मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग झाला आहे.कौटुंबिक सुख समाधानापेक्षा मोबाईल ला महत्व देणे घटस्फोटाचे कारण ठरते आहे. या सर्व प्रकारात मोबाईल व माहेर कारणीभूत ठरत आहे. या समस्येला आळा बसावा याकरिता सविस्तर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. भारतीय परिवार बचाव संघटना चंद्रपूर कडून अमोल कासारे पोलीस निरीक्षक वरोरा यांना शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आले. त्यात संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर, वसंत भलमे, मोहन जीवतोडे, प्रदीप गोविंदवार, सुदर्शन नैताम, सचिन बरबटकर, प्रशांत मडावी, नितीन चांदेकर, गंगाधर गुरूनुले स्वप्नील सूत्रपवार, आदी उपस्थित होते. अलीकडच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहेत घटस्फोटाची आकडेवारी कुटुंब व्यवस्थेला हादरवून टाकणारी आहे. यात मोबाईल व माहेर खरे खलनायक ठरत असून कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या एकूण दाव्या पैकी 40% वादाचे कारण मोबाईल व माहेर असल्याचे आढळून आलेले आहे. सुखी व समृद्ध कुटुंबात मोबाईल व माहेर खलनायक ठरतोय N C R B नुसार 2022 मध्ये एक लाख 13 हजार पुरुषांच्या आत्महत्या झाल्या. मोबाईल व माहेर पती-पत्नीचे संबंध जोडण्यापूर्वीच तोडत असल्याचे चित्र अलीकडे पहावयास मिळत आहे. मोबाईल हा पती-पत्नीत संशय निर्माण करतोय व माहेर पती व सासरला बोटावर नाचविण्याचा सल्ला देत असतात. तसेच जावई सासरला गजाआड करण्याची खुमखुमी दाखवत असतात. आपल्या मुलीचा संसार चांगल्या प्रकारे थाटल्या गेला पाहिजे असे वाटत असेल तर लग्नानंतर माहेरने विनाकारण त्यांच्या संसारात लुडबुड करणे अवास्तव संपर्क करणे बंद करावे. पती-पत्नीला संसारात रुळू, द्यावे त्याचे मन संसारात रमू द्यावे, पती-पत्नीच्या नाजूक नात्यावर मोबाईल व माहेर भारी पडत आहे. मोबाईलवर सतत बोलणे, व्हाट्सअप वर चॅटिंग करणे, मोबाईलवर बोलत असताना कौटुंबिक महत्त्व कमी करणे, वडीलधाऱ्यांचा मान न राखणे, यातून होणाऱ्या गैरसमजुतीतून विसंवाद आणि वाढणारा संशय हे पती-पत्नी मधील कौटुंबिक वादाचे कारण महत्त्वाचे कारण ठरत आहे. नवऱ्याचा मोबाईल बायकोला सवती सारखा वाटतोय परंतु स्वतःच्या मोबाईलचा अमर्याद वापर करूनही तो सखा वाटतो. तिथेच वादाची ठिणगी पडते मोबाईलचा वापर सासर आणि माहेर येतील गोडवा वाढविण्यास करावा. मोबाईलच्या योग्य वापरामुळे कुटुंबात मधुरता वाढेल गैरवापरामुळे दुरावा वाढतोय कुटुंब सुखी समाधानी असल्यास समाज सुदृढ होईल व समाज मजबुतीमुळे देश व संस्कृती अभाधित राहील. विवाह हे पवित्र बंधन मानले जाते यात घटस्फोटाला थारा नको. मोबाईलचा योग्य वापर व माहेरचा योग्य सल्ला समृद्ध कुटुंबाचे आधारस्तंभ ठरतील असे वर्तन माहेरचे व सासरचे असावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close