Gamesअहेरी तालुका

आल्लापल्ली येथील बॅडमिंटनपटूला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत …!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : आलापल्ली येथील बॅडमिंटनपटू शैलू केशनवार ह्या नागपूर येथे होणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी जायची तयारी करीत असले तरी त्यांची घरची परिस्थिती मात्र गरिबीची आहे.

माजी जि.प.अध्यक्ष व अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना येथील कार्यकर्ते प्रकाश कोरेत,उमेश आत्राम,स्वामी वेलादी यांनी बॅडमिंटनपटू ची घराची आर्थिक परिस्थितीची माहिती दिली असता माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रकाश कोरेत,उमेश आत्राम, स्वामी वेलादी यांच्या मार्फतीने बॅडमिंटनपटू मुलीला आर्थिक मदत पाठविले. या आर्थिक मदतीमुळे सदर बॅडमिंटनपटू मुलीला नागपूरला जाण्याची मार्ग सुकर झाल्याने बॅडमिंटनपटू मुलगी व त्यांचे कुटुंबीयांनी अजयभाऊंची आभार मानले.

आल्लापल्ली येथील बॅडमिंटनपटू व त्यांचे कुटुंबीयांनी या आर्थिक मदतीबद्दल कंकडालवार यांचेप्रति समाधान व्यक्त केले. बॅडमिंटन पटूला आर्थिक मदत करतांना आदिवासी विद्यार्थी संघाचे व अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close