अहेरी तालुकाशैक्षणिक

समूह साधन केंद्र बोरी अंतर्गत शिक्षण परिषद व निरोप कार्यक्रम संपन्न ..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी…
समुह साधन केंद्र बोरी अंतर्गत शिक्षकांसाठीची तिसरी शिक्षण परिषद व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा निरोप कार्यक्रम जि.प.प्राथमिक शाळा आपापल्ली येथील सभागृहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख लक्ष्मी कुसराम या होत्या तर प्रमुख उपस्थिती सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी रामचंद्र मुंगमोडे,सेवानिवृत्त शिक्षक त्रिनगरीवार,उच्च श्रेणी मुख्याध्यापक गोपाल खेवले,ममता खरवडे यांची होती.
सुरवातीला शिक्षण परिषदेच्या नियोजित तासिका घेण्यात आल्या.त्यात शासनाच्या विविध योजना ,फुलोरा अंतर्गत स्तरनिश्चीकरन व सध्याची शाळांची स्थिती व त्यावरील उपाययोजना तसेच मानसिक आरोग्य स्वास्थ्य अंतर्गत तानतनावाचे व्यवस्थापन व शाळा स्तरावर घ्यायचे कार्यक्रम उपक्रम याविषयावर सुलभक अनिल चांदेकर,शैला गोरेकर व केंद्र प्रमुख लक्ष्मी कुसराम यांनी मार्गदर्शन केले….
परिषदेच्या दुस-या सत्रात सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी रामचंद्र मुंगमोळे,शिक्षक त्रिनगीवार व बदलुन गेलेले उच्च श्रेणी मुख्याध्यापक गोपाल खेवले व शिक्षीका ममता खरवडे याना केंद्रातर्फ शाल श्रीफळ व भेट वस्तु देवुन सपत्नीक सत्कार करण्यात आला.याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी रामचंद्र मुंगमोळे ,गोपाल खेवले व ममता खरवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी केलेले कार्य व हे कार्य करण्यासाठी शिक्षकांचे मिळालेले सहकार्य याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्यात.केंद्रातर्फ शिक्षक प्रकाश दुर्गे व शिक्षक डाॅ.आत्माराम तोंडे यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रम संचालन कु.शैला गोरेकर तर आभार प्रदर्शन कु.सुरेखा मेश्राम यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक बद्दीवार,वाघमारे,मंत्रीवार,रवि येमसलवार,राजु आत्राम व केंद्रातील सर्व शिक्षक,मुख्याध्यापक यांचे सहकार्य मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close