सिरोंचा तालुका

सिरोंचा तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील आशा सेविका व गट प्रवर्तकांची निदर्शने…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा :-सिरोंचा तालुक्यातील आशा सेविका व आशा गटप्रवर्तकांनी काल येथील तहसील कार्यालयासमोर मानधन वाढीसाठी तीव्र निदर्शने केली.
सिरोंचा तालुक्यातील आशा सेविका/आशा गटप्रवर्तक मागील 2005 पासून आरोग्य सेवेत आशा सेविका व प्रवर्तक म्हणून कार्यरत आहेत.
आशा सेविका/गटप्रवर्तकांची शासकीय कर्मचाऱ्यांची दर्जा देण्यात यावी, आणि आशा सेविका/गटप्रवर्तकांना 2008 पासून मानधन वेतनात वाढ केली नाही,किमान मानधन वेतन दरमहा १८००० रु करण्यात यावे,
आशा सेविका/गटप्रवर्तकांना ड्युटीवर असताना अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसदारांना तात्काळ दाह लाख रुपयांचे आर्थिक मदत देण्यात यावे,गटप्रवर्तकांना आशा सुपरवायझर असे नावही देण्यात यावे, असे विविध मागणी घेऊन सिरोंचा तालुक्यातील आशा सेविका/गटप्रवर्तकांनी काल १८ अक्टोबर ला येथील तहसील कार्यालयात निवेदन देऊन बेमुदत संप आंदोलनाला सुरुवात केली आहे. येथील नायब तहसीलदारांनी आशा सेविकांची निवेदन स्वीकारले.

दरम्यान आशा सेविकांची मागणी रास्त असून या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)गटाने पाठींबा दर्शविला आहे.सरकारकडून आशा सेविका व गट प्रवर्तकाना योग्य न्याय न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन उभारण्याची इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष -सागर मूलकला, कार्यकर्ते विनोद नायडू, सलमान शेख, राजकुमार मूलकला,गणेश सॅड्र आदींनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close