अहेरी तालुकासामाजिक

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची विदर्भ आंदोलन समितीचे पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची विदर्भ आंदोलन समितीचे पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन स्वतंत्र विदर्भ निर्मिती व त्यासाठी आजपर्यंत झालेल्या आंदोलनाविषयी चर्चा करण्यात आली.यावेळी विदर्भ आंदोलन समितीचे पदाधिकाऱ्यांनी विदर्भ राज्य आंदोलन कडून होणाऱ्या आंदोलनात सक्रिय सहभागाची आशा व्यक्त करून स्वतंत्र विदर्भ निर्माण बाबतीत माहिती असलेल्या विदर्भाचा ७/१२ नावाचं पुस्तक कांकडालवार यांना भेट देण्यात आली.याभेटी दरम्यान अजयभाऊ कंकडालवार यांनी विदर्भ आंदोलन समितीचे पदाधिकाऱ्यांची योग्य मान सन्मान करून समितीला आपल्या परीने सहकार्य करण्याचे शब्द दिले.

यावेळी विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष व माजी आमदार वामनराव चटप,मुकेश मासूरकर,युवा आघाडी अध्यक्ष तात्यासाहेब,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेकसह विदर्भ आंदोलन समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close