मूलचेरा तालुकासांस्कृतिक कार्यक्रम

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते दंडार कार्यक्रमाची उदघाटन..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

गडचिरोली : आदिवासी संस्कृती संवर्धनाबरोबर समाज जोडणाऱ्या दंडार”या”लोकनृत्याची लोकप्रियता माहिती तंत्रज्ञान युगात आजही टिकून आहे.सध्याच्या स्थितीला मनाला भुरळ घालणारी मनोरंजनाची व समाज प्रबोधनाची साधने घरोघरी पोहोचली आहेत.प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे.माहिती तंत्रज्ञान युगात नवी क्रांती झाली.तरीही जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा जोपासणाऱ्या दंडार लोकनृत्याची आवड आजही पूर्वीसारखीच आहे.

मुलचेरा तालुक्यातील मलेझरी अंतर्गत येत असलेल्या धन्नूर येथील दीपावली – भाऊबीज निमित्त गोंडवाना महिला ग्रामसभा तर्फे दंडार कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमाचे उदघाटन आविसं तथा अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषिउत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली. उदघाटन कार्यक्रम आटोपल्यावर गोंडवाना महिला ग्रामसभा तर्फे महिला वर्गांनी अजयभाऊंची शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच रोशनी कुसनाके प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य कालिदास कुसनाके,महागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्रीनिवास आलाम,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,गणेश चौधरी होते.

यावेळी गोंडवाना महिला ग्रामसंघाचे अध्यक्ष सरिता सेडमाके,सचिव करूना सिडाम,भावना कुसनाके पो.पा,वसुधा तलांडे सामू.वनहक्क समिती अध्यक्ष,साखळी मडावी पशू सखी,जीवनकला कुसनाके ग्रामकोष समिती सदस्य,प्रतिष्ठित नागरिक तुकाराम सेडमाके,नेताजी कुसनाके,रमनदास सोयाम,गजानन तलांडे,अर्जुन सेडमाके,लक्ष्मण तोरे,शांताराम तोडसाम,दिवाकर तलांडे युवा सामाजिक कार्यकर्ते,किशोर सेडमाके,साईनाथ मडावी, विलास सेडमाके,प्रदीप सेडमाके,अंबादास कुसनाके महिला प्रतिनिधी गयाबाई तलांडे,वनिता सेडमाके,वच्छला तोरे,अन्नपूर्णा कोवे,जिवनकला पेंदाम,ललिता कुसनाके,सुमन तोरे,जोत्सना तोरे,छाया तोरे,ललिता सेडमाके,रेणुका कुसनाके,वैशाली तोरे,रेखा सेडमाके सपना सेडमाके,ज्योती पेंदाम,काजल कन्नाके,कार्यक्रमाचे संचालन गट प्रवर्तक रेशमा पेंदाम,सविता कुसनाके,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गोंडवाना महिला संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील महिला वर्ग – पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close