सिरोंचा तालुक्यातील गर्कापेठा येथील व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा :तालुक्यातील गरकापेठा येथे बि.आर.एस व आविस कडून आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन नुकतेच भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.
या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आविस सिरकोंडा सरपंच लक्ष्मण गावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून मादाराम सरपंच दिवाकर कोरेत, आविस जेष्ठ सल्लागार डॉ.बिचमय्या कुडमेथे,बामणी माजी उपसरपंच व्यंकटी कारसपल्ली,माजी सरपंच इरपा मडावी,जसवंत कोंडागुर्ले,आविस सल्लागार विजय रेपलवार, आविस सल्लागार वाईल तिरुपती, सतीश गावडे,प्रवीण इंदुरी, शंकर मडावी,प्रशांत गावडे,आत्राम मोडेम,व्यंकटस्वामी रामटेके,राजण्णा दुर्गम,इरशाद शेख, अंकुश दुर्गे,मिलिंद अलोने,जुलेख शेख,विनोद कावेरी,चंद्रमोगली माडेम, समीर कोटरंगी सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित खेळाडू व नागरिकांना व्हॉलीबॉल या मैदानी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामीण व्हॉलीबॉल या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार माजी सरपंच विजय कुसनाके यांच्या कडून व तृतीय पुरस्कार सिरोंचा नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या कडून ठेवण्यात आले. गरकापेठा येथील बि.आर.एस.व आविस कडून आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे यशस्वीतेसाठी रवींद्र रामटेकी,व्यंकटी गावडे,समय्या कोंडागुर्ला,संदीप आसम,समय्या आसम,संजू रामटेके,आकाश मोर्ला, रोहन दुर्गम,शेखर दुर्गम,यशवंत कोंडागुर्ला, सुहास कोंडागुर्ला, राजलींगु कुमरी,नागेश कुमरी,सुनील गावडे,सडवली गावडे,मनोज आत्राम,सुरेश तलांडी, रामू गावडे यांनी परिश्रम घेतले. उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आविस जेष्ठ सल्लागार डॉ. बिचमय्या कुडमेथे यांनी मानले.या उदघाटनीय सोहळ्याला गरकापेठा सह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.