अहेरी तालुकासामाजिक

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून छल्लेवाडा येथील आगग्रस्त लेंनगुरे कुटुंबाला आर्थिक मदत…!

अहेरी : तालुक्यातील छल्लेवाडा येथील सुरेश तिरुपती लेंनगुरे यांच्या घराला अचानक आग लागल्याने या आगीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाली होते.त्यात जीवनावश्यक वस्तु व पैसे,आधार कार्ड,पास बुकसह इत्यादी आवश्यक कागदपत्रे जाळून खाक झाले होते.

सदर बाब आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच त्यांनी आगग्रस्त कुटूंबातील प्रमुख व्यक्ती सुरेश लेंनगुरे यांना अहेरी येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात बोलावून त्यांना आर्थिक मदत देण्यात आली.

प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मदत करणार असल्याचं सांगत आगग्रस्त कुटुंबाला धीर देत जनतेच्या अडीअडचणीत नेहमी आपला सहभाग राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी जि.प.सदस्य मा.अजय नैताम,मा.माजी जि.प.सदस्य कु.सुनीता कुसनाके,मा.भास्कर तलांडे माजी प.स.सभापती अहेरी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी ,सुधाकर तिम्मा आ.वि.स.तालुका अध्यक्ष भामरागड,अशोक येलमुले उपसरपंच,हनमंतु लसमय्या ठाकरे,संजीव चेकनलवार,श्रीनिवास लेंडगुरे,विलास बोरकर,गुलाब देवगडे, दासू कांबडे, सुनील रत्नम,राजाराम दुर्गे,प्रशांत गुरनुले,महेश गुरनुलेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close