वनविभागाने रानटी म्हैसची बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा :- सिरोंचा तालुक्यातील अंकीसा परिसरातील असलेल्या चिंतरेवला गावाचे शेतात शुक्रवारी 29 डिसेंबर रोजी, दुपारी 4 वाजता, जंगलातील रानटी म्हैस कापसाच्या शेतात वावरताना येथील शेतकरी व शेतमजुरांना दिसली आहे.
चिंतरेवला गावात सध्या कापूस वेचणीची हंगामा सुरू आहे, चिंतरेवाला गावाचे शेतकरी बांधव रात्रंदिवस एकटे – दुकटे शेतात कामासाठी जातात,
रानटी म्हैसमळे येथील शेतकरी आणि शेतमजुरांना मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच
रानटी म्हैस येतील चिंतरेवूलासह परिसरातील शेतातील कापसांची मोठी नुकसान करीत आहे,यामुळे शेतकऱ्यांची नुकसान होत आहे.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतातील कापुस पिकांची पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच रानटी म्हशी ची योग्य बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुल गण्यारपवार ,सिरोंचा तालुका अध्यक्ष फाजील पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांनी मागणी केली आहे.